Next
सामाजिक विषयावरील ‘अ ब क’ या चित्रपटाचा शुभारंभ
प्रेस रिलीज
Monday, June 05, 2017 | 05:25 PM
15 0 0
Share this story

पुणे : ग्रॅव्हिटी एंटरटेन्मेंट व गोल्डन ग्लोब प्रस्तुत आणि मिहीर सुधीर कुलकर्णी निर्मित ‘अ ब क’ या मराठी चित्रपटाचा शुभारंभ प्रसिद्ध अभिनेते सुनील शेट्टी आणि अमृता देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते नुकताच करण्यात आला. या प्रसंगी ‘लायन’फेम सनी पवार याचे आजोबा भीमराव पवार, चित्रपटाचे दिग्दर्शक रामकुमार शेडगे, लेखक आबा गायकवाड, महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, चित्रपटाचे निर्माते मिहीर सुधीर कुलकर्णी हे मान्यवर उपस्थित होते. 

 ग्रॅव्हिटी ग्रुप गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. ‘ग्रॅव्हिटी एंटरटेन्मेंट यापुढे सामाजिक विषयांवरील दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करून आपला समाजसेवेचा वसा कायम ठेवणार आहे,’ असे मत निर्माते मिहीर कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ‘सध्या मराठी चित्रपट उत्तुंग यश संपादित करत आहे. या चित्रपटात मीही काम करतोय. मला मराठी चित्रपट खूप आवडतात. मी उत्तम मराठी बोलतो. ‘अ ब क’ हा  चित्रपट खूप यश संपादन करेल याची मला खात्री आहे,’ अशी भावना अभिनेते सुनील शेट्टी यांनी व्यक्त केली. 

‘सामाजिक समस्या सोडवण्यासाठी ‘अ ब क’सारख्या वेगळ्या विषयांवरील चित्रपटांची आज गरज आहे. मुलामुलींमध्ये भेदभाव न करता मुलींनाही दर्जेदार शिक्षण दिले पाहिजे,’ अशी भावना व्यक्त करत अमृता फडणवीस यांनी मिहीर कुलकर्णी आणि त्यांच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. ‘अ ब क’ या चित्रपटाचे दिग्दर्शन रामकुमार शेडगे करणार असून, चित्रपटाची कथा, संवाद, पटकथा आबा गायकवाड यांची आहे, तर संगीत राहुल रानडे यांचे आहे. या चित्रपटात सनी पवारसोबतच नवाजुद्दीन सिद्दिकी, तमन्ना भाटिया, सुनील शेट्टी, तन्वी सिन्हा हे दिग्गज कलावंत काम करणार आहेत. 

या चित्रपटाचे वैशिष्ट्य असे, की हा चित्रपट एकाच वेळी मराठी, हिंदी, इंग्रजी, तमीळ, तेलुगू, अशा पाच भाषांत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी अमृता देवेंद्र फडणवीस पार्श्वगायन करणार असून, चित्रपटाचे चित्रिकरण १५ ऑगस्टपासून सुरू होणार आहे.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link