Next
हरित सेनेच्या विद्यार्थ्यांचे वृक्षांसोबत रक्षाबंधन
BOI
Saturday, August 25, 2018 | 06:47 PM
15 0 0
Share this article:

सोलापूर : श्री क्षेत्र अरण (ता. माढा) येथील हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी शनिवारी (२५ ऑगस्ट २०१८) झाडांना राख्या बांधून वृक्षसंवर्धन करण्याचा निर्धार केला. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला झाडांचे रक्षण करण्याचा वसा या विद्यार्थ्यांनी घेतल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

रक्षाबंधनाच्या सणाला बहीण भावाला राखी बांधते, भाऊ बहिणीचा पाठीराखा म्हणून तिचे रक्षण करतो. बहीण-भावाच्या या अतूट नात्याचा धागा पकडून हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी अनोखे रक्षाबंधन साजरे केले. त्यांनी झाडांसोबत हे नाते जोपासण्यासाठी शालेय परिसर व घराभोवतालच्या झाडांना पाने, फुले व बियांपासून बनविलेल्या राख्या बांधल्या. ‘झाडांमुळे आम्ही जिवंत आहोत. झाडे आमच्यासाठी सर्व काही आहेत. त्यांचा आम्ही अविरत सांभाळ करणार व त्यांचे संरक्षण सुद्धा करणार,’ अशी भावना त्यांनी आपल्या कृतीतून व्यक्त केली. हरित सेनेच्या मुला-मुलींनी या उपक्रमाला भरपूर प्रतिसाद दिला. अरण येथील संत सावता माळी विद्यालयातील राष्ट्रीय हरित सेना विभाग व कुर्डुवाडी येथील सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने इको फ्रेंडली रक्षाबंधन साजरे करण्यात आले. या वेळी हरितसेनेच्या विद्यार्थ्यांना पाने, फुले व बियांपासून राख्या बनविण्याचे प्रात्यक्षिक हरित सेनेचे समन्वयक तानाजी इंगळे यांनी दाखविले. 

या वेळी मुख्याध्यापक औदुंबर भांगे, पर्यवेक्षक सुरेश मोरे, सांस्कृतिक विभागप्रमुख उत्तमराव सावंत, मराठी विभागप्रमुख दत्तात्रय ढगे, प्रभाकर दळवी, सावता घाडगे, अर्चना कुलकर्णी, सतीश घाडगे, महादेव निंबाळकर, किरण काटकर, गणेश राऊत आदी उपस्थित होते.

(पाना-फुलांपासून राख्या कशा बनविल्या, ते प्रात्यक्षिक पाहा सोबतच्या व्हिडिओत...)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
तानाजी इंगळे About 297 Days ago
हे माध्यम नेहमी वेगळ्या व हटके बातम्याना तात्काळ चांंगल्या बातम्या,वेगवेगळ्या घडामोडी,विशेष उपक्रम याना भरपूर स्पेस देऊन, वेगळ्या पध्दतीने प्रसिध्दी दिली जाते. यामुळेच हे नेटवर्क वाचकांना नेहमी आपले वाटते .
1
0

Select Language
Share Link
 
Search