Next
बँक ऑफ महाराष्ट्रच्या नफ्यात वाढ
प्रेस रिलीज
Thursday, February 08 | 03:01 PM
15 0 0
Share this story

बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आर. पी. मराठे, कार्यकारी संचालक आर. के. गुप्ता आणि कार्यकारी संचालक ए. सी. राऊत

पुणे : बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आर. पी. मराठे यांनी ३१ डिसेंबर २०१७ रोजी संपलेल्या तिमाहीचे आर्थिक परिणाम, सहा फेब्रुवारी २०१८ रोजी बँकेचे कार्यकारी संचालक आर. के. गुप्ता आणि कार्यकारी संचालक ए. सी. राऊत यांच्या उपस्थितीत जाहीर केले.

याप्रसंगी बोलताना आर. पी. मराठे म्हणाले, ‘बँक एकत्रीकरणाच्या टप्प्यात आहे. ३१ डिसेंबर २०१७ रोजी संपलेल्या नऊमाहीमध्ये डिसेंबर २०१६ रोजी संपलेल्या नऊमाहीच्या तुलनेत, बँकेच्या कार्यान्वयन नफ्यात १७.३९ टक्क्यांची वाढ झालेली आहे. सामुहिक आणि एकत्रित प्रयत्नांमुळे ३१ डिसेंबर २०१६ च्या तुलनेत ३१ डिसेंबर २०१७ ला संपलेल्या नऊमाहीमध्ये थकित कर्जाच्या रोख वसुलीमध्ये १७७.७८% वाढ झाली आहे.’

बँकेच्या व्यवसाय वृद्धीमधील संधीबाबत बोलताना ते म्हणाले, ‘भारत सरकार आणि क्यूआयपीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भांडवलामध्ये सहकार्य मिळाल्याने आमच्याकडे पुरेसे भांडवल आहे. ज्यायोगे लघुउद्योग, कृषी आणि किरकोळ कर्जे यासारख्या व्यवसायवाढीच्या केंद्रांवर बँक लक्ष केंद्रित करू शकेल. आम्ही आमच्या किरकोळ कर्जाचा विभाग बळकट करण्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत.’

बँकेच्या कामगिरीची ठळक वैशिष्ट्ये
बँकेचा कार्यान्वयन नफा गतवर्षीच्या याच नऊमाहीच्या तुलनेत १७.३९ टक्क्यांनी वाढून १,६४४.६७ कोटी रुपये इतका झाला. 
बँकेच्या कार्यान्वयीन खर्चामध्ये तसेच अतिरिक्त (ओव्हरेड) खर्चामध्ये याच कालावधीमध्ये कपात झाली. 
बँकेच्या एकूण ठेवींमध्ये कासा ठेवींचे प्रमाण ४५ टक्के असल्याने, व्याजावरील खर्च कमी होण्यास हे प्रमाण सुदृढ आहे.
व्याजावरील खर्चामध्ये ११.७५ टक्क्यांनी घट झाली. 
निव्वळ व्याज उत्पन्न वार्षिक आधारावर ९७.२७ कोटी रुपयांनी (४.०३ टक्के) वाढून, ते २५०८.५४ कोटी रुपये इतके झाले.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार एनसीएलटीला संदर्भित केलेल्या प्रकरणांवर आवश्यबक अधिक तरतूदीच्या कारणाने निव्वळ तोट्यामध्ये वाढ झाली आणि बॉण्डक उत्पन्नामध्ये अचानक झालेल्या वाढीमुळे गुंतवणुकीवर ‘मार्क टू मार्केट’ (एमटीएम) तोटा झाला.
रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार एनसीएलटीला संदर्भित केलेल्या प्रकरणांवर ३१ डिसेंबर २०१७ ला संपलेल्या काळासाठी बँकेने ६५६ कोटींची अतिरिक्त३ तरतूद केली.
आर्थिक वर्ष २०१८ च्या तिसऱ्या तिमाहीत बँकेने गुंतवणूकींवरील एमटीएम तोट्यासाठी १०७ कोटींची तरतूद केली.
ठेवींच्या मूल्यांमध्ये  ३१ डिसेंबर २०१७ रोजी संपलेल्या नऊमाही काळात (५.४१%) ७६ बीपीएसने घट झाली.

व्यवसाय :
३१ डिसेंबर २०१७ रोजी बँकेचा एकूण व्यवसाय २२८७६२.३३ कोटी, एकूण ठेवी रु. १३३५९३.१६ कोटी आणि एकूण कर्जे रु. ९५१६९.१७ कोटी झाली.
मुख्यठत: वाहन कर्जे (४८.३०%), शैक्षणिक कर्जे (१२.३६%) यामध्ये झालेल्या भरघोस वाढीने वार्षिक आधारावर किरकोळ कर्जे ५.६१ टक्याने वाढून रु. १३५३७ कोटी इतकी झाली. एकूण कर्जामध्ये किरकोळ कर्जाचा वाटा वार्षिक आधारावर १.६८% ने वाढून १४.२२% इतका झाला.
कासा ठेवींचे प्रमाण एकूण ठेवींच्या ४४.८६ टक्के आहे. 
 
थकीत कर्जे व्यवस्थापन :
३१ डिसेंबर २०१७ रोजी एकूण थकीत कर्जे १८,१२८.२६ कोटी रुपये (एकूण कर्जाच्या १९.०५%) आणि निव्वळ थकीत कर्जे १०,६७०.२४ कोटी रुपये (निव्वळ कर्जाच्या १२.१७%) राहिली आहेत.
तरतूद कव्हरेज (संरक्षण) गुणोत्तर ३१ डिसेंबर २०१७ रोजी ५३.४०% राहिले.

भांडवल पर्याप्तता :
भांडवल पर्याप्ततेचे प्रमाण ३१.१२.२०१७, रोजी बेसल III अन्वये १०.२५% (सीईटी १-६.७५%) च्या किमान आवश्यकतेच्या तुलनेमध्ये, ११.२९ टक्याच्या (सीईटी १-७.२३%) सीआरएआरसह चांगल्या स्थितीमध्ये राहिले.
आर्थिक वर्ष १८ च्या तिसऱ्या तिमाही काळात बँकेने क्वासलिफाईड इन्टीक व ट्यूशनल प्लेकसमेंटच्या (क्यूनआईपी) माध्य्मातून मार्केटमधून ३१३.५५ कोटी रुपयांचे भांडवल उभे केले. बँकेला भारत सरकारकडून ६५० कोटींच्या रकमेचे सहकार्य प्राप्त झाले आहे.

भविष्याकडे:
बँकेने  अंचल कार्यालय आणि शाखा यांच्या सुसूत्रीकरणाद्वारे खर्चामध्ये कपात आणि नफ्यामध्ये वाढ करण्यासाठी, योजना आखून त्या लागू केल्या. बँकेने यावर्षी याआधीच ३४ शाखा आणि ३ अंचल कार्यालयांचे एकत्रीकरण केलेले आहे.
कॉर्पोरेट कर्जावर कमी लक्ष देणे आणि एकूण कर्जामधील किरकोळ कर्जाचे प्रमाण वाढवणे.
आम्ही आमचे वसुलीचे प्रयत्न सुरूच ठेवणार असून पुढील स्लीपेजेस होवू न देण्यासाठी त्यांना अटकाव करू.
आमच्या व्याजेतर उत्पन्नामध्ये वाढ होण्यासाठी लक्ष केंद्रित करू.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link