Next
अमरेंद्र गाडगीळ, राम कोलारकर, डॉ. सदानंद मोरे
BOI
Monday, June 25, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this story

बालसाहित्यकार आणि कोशकार अमरेंद्र गाडगीळ, मराठी कथा आणि अनुवादांचे उत्कृष्ट संकलन करणारे राम कोलारकर आणि संतसाहित्याचे गाढे अभ्यासक आणि समीक्षक डॉ. सदानंद मोरे यांचा २५ जून हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
.... 
अमरेंद्र लक्ष्मण गाडगीळ 

२५ जून १९१९ रोजी जन्मलेले अमरेंद्र लक्ष्मण गाडगीळ हे बालसाहित्यकार आणि कोशकार म्हणून ओळखले जातात. ते अखिल मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे संस्थापक होते. त्यांनी ‘गोकुळ’ या मुलांच्या मासिकाचे संपादक म्हणून काम पाहिलं होतं. १९७८ साली इचलकरंजीमध्ये भरलेल्या मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांनी दैवत कोशांची निर्मिती केली. 

जीवनसंग्राम, ताई अन् भाऊ, वटपत्र, राष्ट्रसेवकाची शिदोरी, राम बंधू त्याग सिंधू, उक्तीविशेष, साहित्य सरिता, अज्ञाताची वचने, वंदे मातरम, किशोर मित्रांनो, देवादिकांच्या गोष्टी, गणेशकोश, हनुमान कोश, श्रीराम कोश, अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

तीन जानेवारी १९९४ रोजी त्यांचा मृत्यू झाला.

(अमरेंद्र गाडगीळ यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)
.......   

रामचंद्र बाळकृष्ण कोलारकर

२५ जून १९३५ रोजी जन्मलेले रामचंद्र बाळकृष्ण कोलारकर हे कथा समीक्षक आणि कथा संकलक म्हणून प्रसिद्ध आहेत. मराठी कथा आणि अनुवादित कथांच्या संकलनाचं त्यांचं कार्य वाङ्मयेतिहासिक दृष्टीनं महत्त्वाचं ठरलं आहे. 

सर्वोत्कृष्ट मराठी कथा (दहा भाग), सर्वोत्कृष्ट मराठी विनोदी कथा (दहा भाग), कमलाबाई टिळक यांच्या कथा, पुन्हा आज रात्री, सर्वोत्कृष्ट मराठी ऐतिहासिक कथा (दहा भाग), निवडक कुमारकथा (सहा भाग), अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

.............

डॉ. सदानंद श्रीधर मोरे

२५ जून १९५२ रोजी जन्मलेले डॉ. सदानंद श्रीधर मोरे हे वैचारिक भाष्यकार, कवी, समीक्षक, प्रवचनकार आणि संत साहित्याचे अभ्यासक म्हणून ओळखले जातात. त्यांचा संत तुकारामांवर विशेष अभ्यास आहे. ते तत्त्वज्ञान विषयाचे प्राध्यापक आहेत आणि त्यांनी ‘दी गीता – ए थिअरी ऑफ ह्यूमन ॲक्शन’ हा प्रबंध लिहून डॉक्टरेट मिळवली आहे. 

गर्जा महाराष्ट्र, मंथन, निवडक सकल संत सार्थ गाथा, त्रयोदशी, तुकाराम दर्शन, उजळल्या दिशा, विद्रोहाचे व्याकरण, लोकमान्य ते महात्मा, तुका म्हणे, उंबरठ्यावर, या सम हा, अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे.

२०१५ साली पंजाबमधल्या घुमानमध्ये भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.  

(सदानंद मोरे यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा. दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link