Next
साने गुरुजी कथामालेचे अधिवेशन १९-२० जानेवारीला कोल्हापुरात
BOI
Friday, January 18, 2019 | 02:15 PM
15 0 0
Share this story

कोल्हापूर : अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचे ५२वे वार्षिक अधिवेशन १९ आणि २० जानेवारी २०१९ रोजी कोल्हापुरात होणार आहे. शहरातील दसरा चौक मैदानात हे अधिवेशन होणार आहे. 

कोल्हापूरचे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज या संमेलनाचे उद्घाटन करणार आहेत. विशेष अतिथी म्हणून त्रिपुरा आणि बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, सांगलीतील ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर, सांगलीतील राजारामबापू सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. श्यामराव (अण्णा) पाटील, ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. माजी आमदार श्रीपतराव बोंद्रे हे अधिवेशनाचे स्वागताध्यक्षपद भूषविणार आहेत.

या अधिवेशनात ग्रंथदिंडी, शोभायात्रा, परिसंवाद यांचेही आयोजन करण्यात आले आहे. महिलांचे प्रश्न या विषयावरही चर्चा होणार असून, त्यात मेघा पानसरेंसह विविध कार्यकर्त्या सहभागी होणार आहेत.

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी रात्री कथामालेची वार्षिक सर्वसाधारण सभा, तसेच सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. दुसऱ्या दिवशी नवीन कार्यकारिणीची निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. तसेच ‘महात्मा गांधी : काल, आज आणि उद्या’ या विषयावर परिषदही होणार आहे.

साने गुरुजी कथामालेच्या कार्यकर्त्यांनी या अधिवेशनाला उपस्थित राहावे, असे आवाहन अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचे राष्ट्रीय अध्यक्ष अवधूत म्हमाणे यांनी केले आहे.  
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link