Next
‘ई-फाईलिंगमुळे करप्रणालीत सुसूत्रता’
प्रेस रिलीज
Monday, June 18, 2018 | 03:24 PM
15 0 0
Share this story

प्रत्यक्ष करांवर आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी राजेश अगरवाल, सर्वेश जोशी, आनंद जाखोटिया, गिरीश अहुजा, तरुण घिया, एस. बी. झावरे, सत्यनारायण मुंदडा, रेखा धामणकर, ऋता चितळे व अभिषेक धामणे.

पुणे : ‘केंद्र सरकारने विविध प्रकारचे कर भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ‘ई-फाईलिंग’मुळे करप्रणालीत सुसूत्रता आली असून, वेळेची बचत होत आहे. तसेच, या प्रणालीमुळे भ्रष्टाचाराला आळा बसत असून, काही तक्रारी असतील, तर त्याही लवकर आणि सहज निकाली काढणे शक्य होणार आहे,’ असे मत इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या प्रत्यक्ष कर समितीचे चेअरमन सीए तरुण घिया यांनी व्यक्त केले.

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) पुणे विभागातर्फे प्रत्यक्ष कर समितीच्या सहकार्याने प्रत्यक्ष करांवर (डायरेक्ट टॅक्सेस) आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनावेळी तरुण घिया बोलत होते. कोथरूड एमआयटीच्या प्रांगणात झालेल्या या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी आयसीएआयच्या विभागीय मंडळाचे सदस्य सीए गिरीश अहुजा, सीए सर्वेश जोशी, सीए एस. बी. झावरे, सीए सत्यनारायण मुंदडा, आयसीएआयच्यापुणे विभागाचे चेअरमन आनंद जखोटिया, सीए रेखा धामणकर, उपाध्यक्ष ऋता चितळे, सचिव राजेश अगरवाल, खजिनदार अभिषेक धामणे आदी उपस्थित होते. जवळपास ८५० लोक या परिषदेत सहभागी झाले होते.

सीए तरुण घिया म्हणाले, ‘करप्रणालीतील बदल समजून घ्यायला हवेत. करदात्यांना अधिकाधिक सोयीची अशी प्रणाली विकसित होत असून, ई-असेसमेंट, ई-फाईलिंग यावर भर दिला जात आहे. हे सगळे बदल सीए आणि करदाते यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी अशा परिषद उपयुक्त ठरतात. सीए इन्स्टिट्यूट केंद्र सरकार आणि सीए व करदाते यांच्यातील दुवा आहे. त्यामुळे सीएना येणाऱ्या समस्या, त्यांच्या अडचणी सरकारने ऐकायला हव्यात. सीए हा करदात्यांचा प्रतिनिधी असतो, त्यामुळे बदलांची माहिती घेऊन करदात्यांना सहज परतावा भरण्यासाठी सहकार्य करावे. करप्रणालीचे नियम व धोरण याविषयी प्रत्यक्ष करांवर मार्गदर्शन पुस्तिका काढली आहे.’

सीए एस. बी. झावरे म्हणाले, ‘लोकांच्या मनात सीएविषयी असलेली प्रतिमा बदलणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. त्यांना सहज आणि समजेल अशा भाषेत मार्गदर्शन करण्यासाठी आपण तत्पर असावे. करदात्याचे काम करताना ते आपले स्वतःचे काम आहे, अशी भावना आपल्या मनात असायला हवी.’ 

काही अपरिहार्य कारणामुळे येऊ न शकलेल्या केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी व्हिडीओद्वारे शुभेच्छा संदेश पाठविला होता.‘आयसीएआय’ ही संस्था देशाच्या उभारणीत महत्वाचे योगदान देत आहे. करदात्यांना कर भरण्यासाठी मार्गदर्शक असलेल्या लेखापालांनी (सीए) देशेसेवेचे हे काम असेच चालू ठेवावे, अशा शब्दात त्यांनी ‘आयसीएआय’चे कौतुक केले होते. 

बदलत्या कारप्रणालीनुसार आवश्यक विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ लोकांना बोलाविण्यात आले आहे. चार्टर्ड अकाउंटंट्स सभासदांना प्रोत्साहित करून राष्ट्र उभारणीमध्ये योगदान देण्याच्या उद्देशाने ही परिषद उपयुक्त ठरेल, असे सीए आनंद जाखोटिया यांनी प्रास्ताविकात सांगितले. सीए रेखा धामणकर यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link