Next
दिवाळीचा सण म्हणजे हिंदू संस्कृतीचे सर्वोत्तम प्रतिबिंब : थेरेसा मे
प्रेस रिलीज
Tuesday, October 24 | 05:51 PM
15 0 0
Share this story

ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे
लंडन :  ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी दिवाळीनिमित्त हिंदूंना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या. अनिवासी भारतीय (एनआरआय) व्यावसायिक हिंदुजा ब्रदर्स यांच्या निवासस्थानी दिवाळीनिमित्त आयोजित केलेल्या समारंभात त्यांच्या शुभेच्छा  संदेशाचे वाचन करण्यात आले. या वेळी गेव्हीन विल्यमसन, लॉर्ड तारिक अहमद आणि ब्रिटनमधील भारताचे हाय कमिशनर वाय. के. सिन्हा उपस्थित होते. 

‘दिवाळीचा सण आयुष्य कसं जगावं ते सांगतो, या सणासुदीला हिंदू संस्कृतीचे सर्वोत्तम रूप पाहता येते. दिवाळीच्या निमित्ताने आयुष्याकडे बहारदार पद्धतीने पाहता येते. आदर-सन्मान यांची शिकवण देतानाच, भविष्य बदलताना गतकाळात घडलेल्या गोष्टींचा आवश्यक तो आदर ठेवला पाहिजे, याची शिकवण या सणामुळे मिळते’, असे थेरेसा मे यांनी या संदेशात म्हटले आहे.

ब्रिटनच्या आंतरराष्ट्रीय विकास विभागाच्या विदेश मंत्री प्रीती पटेल यांनी या  संदेशाचे वाचन केले. ‘पंतप्रधान सध्या ब्रुसेल्समध्ये असून, त्या ब्रेक्झिटबाबत वाटाघाटी करण्याची शर्थ करत आहेत’, असे पटेल यांनी या वेळी सांगितले.  

‘ब्रिटन आणि युरोपातील जनजीवनात हिंदु समाजाने मोठे योगदान दिलेले आहे. त्या म्हणाल्या की- संपूर्ण वर्षभर चालणाऱ्या विविध धार्मिक उत्सवांमुळे आमची संसकृत अधिक समृद्ध झाली आहे’, असे ही मे यांनी या संदेशात म्हटले आहे. 

ब्रिटनचे विदेश सचिव बोरिस जॉन्सन म्हणाले ‘माझ्या सासूबाई भारतीय आहेत, त्यांचं नाव दीप आहे - दीप म्हणजे प्रकाश. आणि दिवाळी म्हणजेच माझ्या सासूबाईंचा सण साजरा करण्यासाठीची संधी आहे. सध्या आमचा देश आणि ब्रेक्झिट याबद्दल मीडियामध्ये बऱ्याच उलटसुलट चर्चा सुरू आहेत, यामुळे थोडे औदासिन्यही येते. याच काळात हा दिव्यांचा सण साजरा करत असल्याने आमच्या मनातील अंधःकार दूर होऊन नवीन आशेचा किरण निर्माण होत आहे’.

हिंदुजा ग्रूपचे सह-अध्यक्ष जी. पी. हिंदुजा म्हणाले, ‘दिवाळी हा दिव्यांचा सण आहे. या सणामुळे भूतकाळातील सर्व गोष्टी विसरता येतात, आपल्या शत्रूंना माफ करता येते, चुकीच्या घडलेल्या गोष्टी विसरता येतात, इतकंच नाही तर याच काळात नवीन अध्याय सुरू करता येतो’.

बेरोनेस संदीप वर्मा म्हणाले, ‘दिवाळी हा सण आता ब्रिटनचाच सण झाला आहे. प्रत्येक वर्षी हा सण आम्ही अधिकाधिक चांगल्या प्रकारे साजरा करतो आणि हा आनंदोत्सव सगळ्यांसाठी खुला आहे’.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link