Next
‘अल्ट्राटेक’तर्फे ‘इंडियानेक्स्ट’ विजेत्यांची घोषणा
प्रेस रिलीज
Thursday, May 03 | 04:17 PM
15 0 0
Share this storyमुंबई : अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड या आदित्य बिर्ला ग्रुप कंपनीने ‘इंडियानेक्स्ट २०१७-१८ बिल्डिंग फॉर ए बिलियन’च्या विजेत्यांची घोषणा केली. हा वार्षिक उपक्रम प्रत्येक भारतीयाचे स्वतःचे घर असण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कंपनीने सर्वोत्तम संकल्पना व डिझाइन्स सादर करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना समोर आणतो.

याप्रसंगी बोलताना अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक के. के. महेश्वरी म्हणाले, ‘आपल्या देशाला भेडसावत असलेल्या पायाभूत सुविधासंदर्भातील आव्हानांसाठी सोल्यूशन्स निर्माण करण्याचा अल्ट्राटेक सिमेंटमध्ये आमचा प्रयत्न असतो. आम्हाला वाटते की प्रत्येक भारतीयाकडे त्याच्या स्वप्नातील घर असले पाहिजे. अल्ट्राटेकच्या इंडियानेक्स्ट उपक्रमांतर्गत सुरू करण्यात आलेली ‘बिल्डिंग फॉर ए बिलियन’ ही इंजिनीअरिंग व डिझाइन स्पर्धा या विश्वासाचा पुरावा आहे. हा दृष्टिकोन लक्षात घेत आम्ही जगातील सर्वोत्तम व प्रतिभाशाली विचारांना एकत्र आणत विविध सोल्यूशन्स तयार करण्यासाठी इंडियानेक्स्टची संकल्पना मांडली.’

इंडियानेक्स्ट उपक्रम भारतासाठी योग्य असलेल्या सर्वोत्तम संकल्पना सादर करत इकोसिस्टम सुधारण्यामध्ये आणि सराव करत असलेल्या इंजिनीअर्स व आर्किटेक्ट्ससोबत जागतिक दर्जाचे तज्ज्ञ निर्माण करण्यामध्ये मदत करण्याचा प्रयत्न करतो. २०१८साठी ‘बिल्डिंग फॉर ए बिलियन’ ही थीम आहे. ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करण्यासोबतच त्यांना भारतात परवडणारे घर उपलब्ध व्हावे, यासाठीचा हा प्रयत्न आहे. भारत सरकारची महत्त्वाकांक्षी ‘प्रधानमंत्री आवाज योजने’मधून (पीएमएवाय) प्रेरित असलेल्या या स्पर्धेला ‘हाउसिंग फॉर द अर्बन पूअर’ आणि ‘हाउसिंग फॉर द रुरल पूअर’ अशा दोन विशिष्ट विभागांतर्गत प्रवेशिका मिळाल्या.

पहिल्या पर्वाला मिळालेल्या भव्य यशानंतर ‘इंडियानेक्स्ट’ला यंदा जागतिक स्तरावरील आर्किटेक्ट्स व इंजिनीअर्सकडून चार हजार २५०हून अधिक प्रवेशिका मिळाल्या. दुसर्‍या टप्प्यामध्ये पुरस्कार-विजेते आर्किटेक्ट बी. व्ही. दोशी आणि इंजिनीअर महेंद्र राज यांच्या नेतृत्वांतर्गत प्रख्यात ज्युरीने प्रवेशिकांचे परीक्षण केले. ज्युरी पॅनेलमध्ये दिग्गज व्यक्तींचा समावेश होता, जसे शिक्षणतज्ज्ञ, आर्किटेक्ट, अर्बन प्लानर व कन्जर्वेशन कन्सल्टंट प्रा. एजीके मेनन, शिल्पा आर्किटेक्ट्सच्या संस्थापिका व मुख्य आर्किटेक्ट शैला श्री प्रकाश, स्ट्रक्चरल इंजिनीअरचे (आयआयटी-बॉम्बे) सिव्हिल इंजीनिअर व चेतना कन्सल्टंट्सचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक, पीएचडी (स्ट्रक्चरल इंजिनीअरिंग), एम. टेक (मरिन) बी. ई (सिव्हिल) जी. एच. बसवराज आणि एचडब्ल्यू आर्किटेक्ट्स अकॅडेमिशियनचे प्रमुख व मुख्य आर्किटेक्ट हिरंते वेलंदवे. पॅनेलने प्राप्त प्रवेशिकांमधून १० सर्वोत्तम प्रवेशिकांची निवड केली. राष्ट्रीय प्रथम पारितोषिक विजेते ठरले एफएचडी कन्सल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेडचे प्रदीप जी. केदलया (इंजिनीअर), नागेश बतुला (आर्किटेक्ट) व धुर्गई कुमारन (आर्किटेक्ट). त्यांनी ‘द बॉटम-अप अ‍ॅप्रोच’वर आपले विचार सादर केले.

राष्ट्रीय द्वितीय पारितोषिक विजेते ठरले समीप पदोरा व त्यांचे सहकारी- राजीव शाह (इंजिनीअर), समीप पदोरा (आर्किटेक्ट). यांचा प्रकल्प ‘मॅच द फॉलोईंग’ या थीमवर आधारित होता. ज्युरी प्रशंसनीय बक्षीसे पुढील व्यक्तींना मिळाली- एंगेजिंग स्पेसेसमधील दिनेश के. एस., आर्किटेक्ट ईशा नागपाल आणि आर्किटेक्ट सय्यद सरमद. एम. ए. आर्किटेक्ट्समधील कैलाश सोलंकी, आर्किटेक्ट पुनीत दुआ, आर्किटेक्ट रमीज राजा. अनुपता कुंडू आर्किटेक्ट्समधील सोनाली फडणीस, इंजिनीअर डॉ. अर्नड गोल्डॅक, आर्किटेक्ट यशोदा जोशी, आर्किटेक्ट डॉ. अनुपमा कुंडू.

आर सी आर्किटेक्ट्स प्रा. लि.मधील समीर सावंत आणि आर्किटेक्ट रोहन चव्हाण. कामत डिझाइन स्टुडिओमधील वसंत के, आर्किटेक्ट रेवती शेखर कामत. ‘अकॅडेमिक फ्रंट’मध्ये इंदुभाई पारेख स्कूल ऑफ आर्किटेक्चरचे मानसी पित्रोदा व जया हरियाणी यांना राष्ट्रीय प्रथम पारितोषिक देण्यात आला. त्यांनी ‘ओपनिंग अप स्पेसेस’ या थीमवर आपले प्रेझेंटेशन्स सादर केले. यासोबतच आधियामान कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, होसूर, तामिळनाडू- कमाल बाशा, मधुमिता, अक्षया व लीडर. जामिया मिलिया इस्लामिया, नवी दिल्ली- अर्शमह, देवांश चौहान, फरहीन, मसरूर, फातिमा, शारुख व अशर खान यांना प्रशंसनीय पारितोषिके देण्यात आली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link