Next
राज्य मराठी विकास संस्थेच्या ‘रंगमंच आविष्कार’ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
महाअंतिम फेरीत ३३ जिल्ह्यांतून १९० विद्यार्थ्यांचा सहभाग
BOI
Tuesday, February 05, 2019 | 05:21 PM
15 0 0
Share this story

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या ‘राज्य मराठी विकास संस्थे’अंतर्गत राज्यभरात घेण्यात आलेल्या ‘रंगमंच आविष्कार’ स्पर्धेस शालेय आणि महाविद्यालय विद्यार्थ्यांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला. काव्यवाचन तसेच एकपात्री अभिनय अशा दोन प्रकारांत ही स्पर्धा घेण्यात आली. सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष तसेच सिनेनिर्माते आणि अभिनेते अरुण नलावडे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. 

स्पर्धेची महाअंतिम फेरी एक आणि दोन फेब्रुवारीला पुण्यातील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्रा’त अतिशय उत्साहात पार पडली. पहिल्या दिवशी ‘नाट्य सेन्सॉर बोर्डा’चे अध्यक्ष अभिनेते अरुण नलावडे यांच्या हस्ते एकपात्री अभिनय स्पर्धेचे पारितोषिक वितरण झाले, तर दुसऱ्या दिवशी (दोन फेब्रुवारी) प्रसिद्ध कवी संदीप खरे यांच्या हस्ते काव्य वाचन स्पर्धेचे पारितोषिक वितरण झाले. स्पर्धेच्या राज्यभरातील जिल्हा समन्वयकांचादेखील संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला. या महाअंतिम फेरीत ३३ जिल्ह्यांतून १९० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला, तसेच जिल्हास्तरीय फेरीत ४२३० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

२०१८-१९ हे वर्ष कवी, विनोदी लेखक आणि नाटककार राम गणेश गडकरी (गोविंदाग्रज) यांचे स्मृतिशताब्दी वर्ष, तर महाकवी ग. दि. माडगुळकर आणि सिद्धहस्त लेखक पु. ल. देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. या तिन्हीं दिग्गज साहित्यिकांच्या आठवणींना उजाळा देण्याचा आणि त्यांचे साहित्य सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार ‘राज्य मराठी विकास संस्थे’ने केला होता. त्याचाच एक भाग म्हणून राज्य मराठी विकास संस्थेने या तिन्हीं साहित्यिकांच्या साहित्यकृतींवर आधारित काव्यवाचन आणि एकपात्री अभिनय स्पर्धा आयोजित केली होती. या उपक्रमाला राज्यभरातून उत्तम प्रतिसाद मिळाला.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
किशोर मुळे About 8 Days ago
विजेत्यांचे नावं आणि फोटो कधी जाहीर करणार आहात???
0
0

Select Language
Share Link