Next
दृष्टिबाधित विद्यार्थ्यांना लॅपटॉप वितरण
दी पूना ब्लाईंड मेन्स असोसिएशनचा उपक्रम
BOI
Monday, July 08, 2019 | 12:49 PM
15 0 0
Share this article:


पुणे : डॉ. हेलेन केलर यांच्या जन्मदिनानिमित्त दृष्टिबाधित व्यक्तींच्या प्रशिक्षण, पुनर्वसन, रोजगारासाठी कार्यरत असणाऱ्या दी पूना ब्लाईंड मेन्स असोसिएशन या सामाजिक संस्थेच्या हडपसर येथील टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्युटमधील विद्यार्थ्यांना लॅपटॉप्सचे वाटप करण्यात आले.

सहा ते अठरा महिन्यांचे संगणक प्रशिक्षण पूर्ण केलेल्या या विद्यार्थ्यांना रोटरी क्लब ऑफ पुणे सेंट्रल यांच्या सहकार्याने  सवलतीच्या म्हणजे पन्नास टक्के दरात लॅपटॉप्सचे वाटप करण्यात आले. डेल कंपनीचे लॅपटॉप्स वितरित करण्यात आले.


गेल्या तीन वर्षापासून हा उपक्रम सुरू असून, लॅपटॉप्स वाटपाचा हा सहावा कार्यक्रम होता. अनेक दृष्टिबाधित विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा फायदा होत आहे. हे सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी ग्रामीण भागातील असून, भविष्यात आपल्या करिअरला आकार देण्यासाठी हे लॅपटॉप अत्यंत महत्त्वाचे साधन ठरू शकेल.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search