Next
‘पार्ले’तर्फे ‘यू आर माय पार्ले-जी’ मोहिमेची सुरुवात
प्रेस रिलीज
Tuesday, May 22 | 04:47 PM
15 0 0
Share this story

मुंबई : बिस्किटे आणि मिठाईचे भारतातील अग्रगण्य उत्पादक असलेल्या पार्ले प्रॉडक्ट्सने नुकतीच ‘यू आर माय पार्ले जी’ ही मोहीम सुरू केली आहे. जुन्या आठवणीत रमताना किंवा दैनंदिन आयुष्यात गृहित धरलेल्या गोष्टींची जाणीव होताना एखाद्या कणखर व्यक्तीला जाणवणाऱ्या भावना आणि पार्ले जी बिस्कीट यातील समांतरता समोर आणण्याचा या मोहिमेचा उद्देश आहे.

‘पार्ले जी’ने वर्षानुवर्षे प्रत्येकाच्या जीवनात अर्थ आणि महत्त्व प्राप्त केला आहे, तो पुनर्स्थापित करण्याचा मोहिमेचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. पार्ले प्रॉडक्ट्स सहयोगी प्रायोजक असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०१८च्या हंगामात या पॅन इंडिया मोहिमेची सुरुवात करण्यात आली.

या मोहिमेबाबत बोलताना पार्ले प्रॉडक्ट्सचे विभाग प्रमुख मयांक शाह म्हणाले, ‘आरोग्य आणि पौष्टिकतेशी निगडित असलेले एक मुख्य उत्पादक म्हणून पार्ले-जी अनेक वर्षांपासून भक्कम स्थितीत आहे. तथापि, आम्ही नुकत्याच केलेल्या एका ग्राहक संशोधनातून असे स्पष्ट झाले आहे, की पार्ले जी निव्वळ एक खाद्य पदार्थ किंवा एका सवयीच्या पलीकडे गेले आहे आणि ते भावनांपेक्षा अधिक काहीतरी आहे. आपले आयुष्य कसे एकमेकांशी जोडले गेले आहे आणि आम्ही आज जे काही आहोत त्यात अतिशय महत्त्वाची भूमिका असूनही दुर्लक्षित राहिलेल्या ग्राहकांशी असलेल्या पार्ले जीच्या बंधांना साजरा करण्याचा आमचा प्रयत्न आहे.’

टॅपरूट डेन्त्सू यांच्या संकल्पनेनुसार, या मोहिमेत पाच वैशिष्ट्यपूर्ण जाहिराती असतील. या जाहिरातीत भारतीयांच्या दैनंदिन जीवनातील सुंदर आणि भावनिक क्षण टिपले आहेत. आपण ज्यांना गृहित धरतो असे लोक एका खोलीतील सहकारी आपल्या जुन्या सहकाऱ्याची आठवण काढत आहे, विद्यार्थ्याला त्याच्या शिक्षकाचे मोल समजत आहे, एक प्रशिक्षणार्थी आपल्या वरिष्ठाचे ऋण व्यक्त करत आहे, परदेशी राहणाऱ्या एका तरुणाला आपल्या घराचे मूल्य समजते आणि आता मोठी झालेली मुले लहानपणी कशी खट्याळ होती, याची आठवण काढणारी ज्येष्ठ व्यक्ती अशा माणसांचा यात समावेश आहे. एखाद्याला गृहित धरण्याच्या आपल्या सवयीचा पार्ले जीसाठी रूपकात्मक वापर करण्यात आला आहे.

टॅपरूट डेन्त्सूच्या मुंबईतील कार्यकारी निर्मिती संचालक पल्लवी चक्रवर्ती म्हणाल्या, ‘पार्ले जी एका व्यक्तीसारखे आहे, जी प्रत्येकाच्या आयुष्यात असते आणि जी कायम असते, जरी ती एका कोपऱ्यात असली तरीही. ही मोहीम म्हणजे अशा नातेसंबंधांचा एक उत्सवच आहे. अशा नात्यांकडे आपण लक्षपूर्वक पाहतोच असे नाही पण त्यांच्याशिवाय, आयुष्य आता जसे आहे तसे नसते. यासारखा प्रतिष्ठित ब्रँडच आपण पार्ले जीवर इतके प्रेम का करतो, याचे स्मरण करून देऊ शकतो, हा संदेश यातून मिळतो.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link