Next
‘ब्लूमबर्ग क्विंट’च्या व्हॉट्सअप सेवेला उत्तम प्रतिसाद
प्रेस रिलीज
Monday, March 26 | 11:14 AM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘ब्लूमबर्ग क्विंट’ या भारतातल्या आघाडीच्या व्यवसाय आणि वित्त वृत्त कंपनीने गेल्या वर्षाच्या अखेरीस निर्णयकर्ते आणि व्यावसायिक क्षेत्रातील लोकांसाठी व्हॉट्सअप वृत्त सेवा दाखल केली होती. अल्पावधीतच या सेवेशी अधिकारी आणि उद्योजकांसह एक लाखांहून अधिक वापरकर्ते जोडले गेले आहेत.

व्यावसायिक क्षेत्रातील एक आगळेवेगळे उत्पादन असलेली ही सेवा वापरकर्त्यांना ‘ब्लूमबर्ग क्विंट’च्या रोजच्या रोज दिल्या जाणाऱ्या जागतिक आणि देशांतर्गत व्यावसायिक बातम्या, बाजारातील घडामोडी आणि देशातील सर्वाधिक प्रभावशाली कॉर्पोरेट दिग्गजांचे विचार यांच्याशी जोडते. विशेषकरून या सेवेद्वारे वापरकर्ते स्टॉक्सच्या रिअल टाइम किंमतींवर लक्ष ठेवू शकतात; तसेच ट्रेंडिंग आधारित बातम्यांच्या शोधासाठी हॅशटॅगचा वापर करू शकतात. या सेवेद्वारे ब्लूमबर्ग क्विंट मोबाईलवर चॅट आधारित वृत्त सेवा पुरविण्याचे मॉडेल सादर करणारी या व्यापार क्षेत्रातील पहिली कंपनी बनली आहे.

‘ब्लूमबर्ग’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल उनियाल म्हणाले, ‘व्हॉट्सअप सेवेला लाभलेल्या या अभूतपूर्व प्रतिसादाने आम्ही उत्साहित आहोत. सुरुवातीपासूनच आमचा दृष्टिकोन एकात्मिक, डिजिटल-प्रथम उत्पादनाच्या निर्मितीवर राहिला आहे आणि त्या दिशेने गाठलेला हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. बहुतांश वापरकर्ते हे मौखिक प्रचाराद्वारे तसेच ओळखीच्या माध्यमातून या व्यासपीठाशी जोडले गेलेले आहेत. या उत्पादनाच्या अधिकाधिक प्रसारासह वापरकर्त्यांना सेवांचा एक संच उपलब्ध करून देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.’

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link