Next
‘भारत फोर्ज’तर्फे दहा लाखाव्या ‘क्रँकशाफ्ट’चे उत्पादन
प्रेस रिलीज
Saturday, May 18, 2019 | 04:23 PM
15 0 0
Share this article:


पुणे : तंत्रज्ञान पुरवठा क्षेत्रातील जगातील आघाडीची कंपनी आणि व्यावसायिक वाहनांसाठी अवजड डिझेल क्रँकशाफ्टचे उत्पादन करणाऱ्या भारत फोर्ज लिमिटेड कंपनीने एक अतिशय महत्त्वाचा टप्पा गाठला असून, डेम्लर एजीच्या अवजड इंजिनाला ताकद देणाऱ्या मशिननिर्मित दहा लाखाव्या क्रँकशाफ्टचे उत्पादन ‘भारत फोर्ज’ने पूर्ण केले आहे.

‘भारत फोर्ज’च्या माध्यमातून डेट्रॉइट डिझेल, यूएसएसाठी १३ एल आणि १५ एल इंजिन प्लॅटफॉर्म्ससाठी आवश्यक मशिनिर्मित क्रँकशाफ्ट पुरवले जातात. त्याचबरोबर भारत फोर्ज डेम्लरच्या मॅनहेम, जर्मनीतील कारखान्यासह १३ एल प्लॅटफॉर्म शेअर करते. डेम्लर एजीची ही प्रमुख इंजिन्स व्यावसायिक वाहनांसाठी सर्वोच्च कामगिरी करणारी, अत्याधुनिक तंत्रज्ञानासह बनवण्यात आलेली वैशिष्ट्यपूर्ण इंजिन्स आहेत.

गेल्या जवळपास दोन दशकांपासून ‘भारत फोर्ज’ ‘डेम्लर एजी’ची भागीदार आहे. ‘भारत फोर्ज’ला सुरक्षिततेच्या बाबतीत महत्त्वाची मशिन्ड फ्रँट एक्सेल बीम्स, मशिन क्रँकशाफ्ट्स आणि स्टिअरिंग नकल्स यांसाठी ‘डेम्लर’च्या जर्मनी, अमेरिका, जपान, ब्राझिल आणि भारतातील कारखान्यांचा धोरणात्मक पुरवठादार-भागीदार राहिल्याचा प्रदीर्घ व यशस्वी इतिहास आहे.

या प्रसंगी ‘भारत फोर्ज’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बाबा कल्याणी म्हणाले, ‘या विक्रमी कामगिरीचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे आणि आम्ही ‘डेम्लर’ला या धोरणात्मक भागिदारीबद्दल धन्यवाद देतो, कारण त्यामुळेच आम्हाला हा असामान्य टप्पा गाठण्यास मोलाची मदत झाली. ‘डेम्लर’ आणि ‘भारत फोर्ज’मधील सहकार्यामुळे इंजिनीअरिंग टीम्सनी या यशस्वी प्रवासातील महत्त्वाचा घटक असलेल्या उत्पादन कामगिरीमध्ये लक्षणीय लाभ साध्य केला आहे. ‘डेम्लर’सोबत यापुढेही अशाप्रकारची अतुलनीय कामगिरी करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.’

या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले डेम्लर ट्रक्स आणि बसेसच्या खरेदी विभागाचे प्रमुख डॉ. मार्कस स्कोनेनबर्ग म्हणाले, ‘धन्यवाद, भारत फोर्ज. अत्याधुनिक दर्जाच्या एक दशलक्षपेक्षा जास्त क्रँकशाफ्ट्सबद्दल, १५ वर्षांपेक्षा जास्त काळ सातत्यपूर्ण कामगिरी केल्याबद्दल, नाविन्यपूर्ण औद्योजिकता आणि अभियांत्रिकी क्षेत्राचा ध्यास डेम्लर ट्रक्समध्ये उतरवल्याबाबत आणि या भागिदारीबद्दल, जी केवळ आकडे आणि माहितीच्या भाषेत मांडता येणार नाही.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search