Next
शंभर रुपयांच्या नव्या नोटा दाखल
BOI
Tuesday, October 30 | 11:19 AM
15 0 0
Share this story



नाशिक :
शंभर रुपयांच्या नव्या नोटा नुकत्याच चलनात दाखल झाल्या आहेत. नव्या आकाराच्या आणि नव्या रंगाच्या नोटा तयार करण्याचे काम नाशिक रोडच्या छापखान्यामध्ये अनेक दिवस सुरू होते. आता या नोटा नागरिकांच्या हातात पडायला लागल्या आहेत. शंभर रुपयांच्या जुन्या नोटा रद्द होणार नाहीत, असे रिझर्व्ह बँकेने आधीच स्पष्ट केले आहे. 

नाशिक रोड येथील छापखान्यामधून देशभरात चलनपुरवठा होतो. येथे तयार झालेल्या नोटा देशभरात पोहोचतात. नाशिक येथील स्टेट बँकेच्या शाखेत या नोटा ग्राहकांना मिळू लागल्या आहेत. पूर्वीच्या नोटेपेक्षा आकाराने लहान असणारी जांभळ्या रंगाची ही नोट नागरिक व व्यावसायिकांच्या उत्सुकतेची बाब झाली आहे. सुरुवातीला वितरण कमी असल्याने या नव्या नोटा नागरिकांपर्यंत पोहोचल्या नव्हत्या. आता दिवाळी जवळ आली असतानाच ग्राहकांना त्या मिळू लागल्या आहेत.

नव्या नोटेचे स्वरूप :
या नोटेवर पुढील बाजूस महात्मा गांधीजींचे चित्र आहे, तर मागील बाजूस राणी महालाचे चित्र आहे. ‘स्वच्छ भारत, एक कदम स्वच्छता की ओर’ असा संदेश आहे. नाशिक रोडच्या करन्सी प्रेसमध्ये या नोटांची छपाई करण्यात आली आहे. मध्यंतरी नाशिक रोडच्या प्रेसमधील शंभराच्या नोटेची छपाई थांबविण्यात आली होती. हे काम अन्यत्र देण्यात आले होते. ते आता पुन्हा सुरू झाले आहे. शंभराची जुनी नोट चलनात कायम राहील. ती रद्द केली जाणार नाही, असे रिझर्व्ह बँकेने पूर्वीच स्पष्ट केले आहे. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link