Next
रत्नागिरीत १५ सप्टेंबरला ‘कानसेन’ ग्रुपचे चौथे स्नेहसंमेलन
BOI
Wednesday, September 11, 2019 | 04:03 PM
15 0 0
Share this article:

रत्नागिरी : एखादी गोष्ट वायुवेगाने पसरण्यासाठी व्हॉट्सअॅप हे अत्यंत प्रभावी माध्यम बनले आहे. व्हॉट्सअॅपवरच चार वर्षांपूर्वी ‘कानसेन’ हा संगीतप्रेमींचा एक ग्रुप तयार झाला. त्याद्वारे राज्यभरातील विविध ठिकाणचे लोक जोडले गेले. त्यातून दर वर्षी कानसेन संमेलन होऊ लागले. यंदा या संमेलनाचे सलग चौथे वर्ष असून, १५ सप्टेंबरला हे संमेलन रत्नागिरीतील अंबर हॉलमध्ये होणार आहे. गेल्या वर्षीचे संमेलनही रत्नागिरीतच झाले होते.

कानसेन सभासद व संगीतप्रेमींच्या सहभागामुळे कानसेन संमेलन सलग तीन वर्षे यशस्वीरीत्या पार पडले. यामध्ये रत्नागिरीसह पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद, सांगली आदी भागांतून सभासद आवर्जून उपस्थित राहतात.

या वर्षी संमेलन सकाळी नऊ ते रात्री नऊ या कालावधीत होईल. या दरम्यान गप्पागोष्टींसह सांगीतिक व अन्य वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची रेलचेल असेल. व्यावसायिक कलाकारांबरोबरच हौशी कलाकारांना रंगमंचीय सादरीकरणाची संधी याद्वारे मिळणार आहे. ग्रुप अॅडमिन संजीव वेलणकर, सुनील गाडगीळ संमेलनाची व्यवस्था पाहत असून, याकरिता विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. जास्तीत जास्त संगीतप्रेमींनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन ‘कानसेन’ ग्रुपतर्फे करण्यात आले आहे.

(‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील ‘सूररंगी रंगले’ या सदरातील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा. ‘सुनहरे गीत’ या सदरातील लेख वाचण्यासाठी येथे क्लिककरा. ‘कविता... स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरातील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search