Next
नृत्य आणि गायनातून ‘बसंत उत्सव’ साजरा
प्रेस रिलीज
Monday, February 25, 2019 | 04:19 PM
15 0 0
Share this article:पुणे : बांगीया संस्कृती संसदच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘बसंत उत्सव २०१९’ एम्प्रेस गार्डनच्या निसर्गरम्य वातावरणात उत्साहात साजरा झाला. नृत्य आणि गायनाच्या माध्यमातून वसंत ऋतूच्या छटा उलगडण्यात आल्या. हा २४ फेब्रुवारीला झाला. हे या उत्सवाचे १४वे वर्ष होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन एम्प्रेस गार्डनचे विश्वस्त मंडळ प्रमुख सुरेश पिंगळे, श्रीमती पिंगळे, दूरदर्शन बंगालीच्या पहिल्या निवेदक व अभिनेत्री सास्वती गुहा ठाकूर आणि त्यांची कन्या श्रेया गुहा ठाकूर यांच्या हस्ते झाले. या वेळी आयोजन समितीचे सुजाता पॉल, मधुमिता घोष, अरुण चट्टोपाध्याय, सुबसीस बगल, राखी चटर्जी, बिरेस्वर मित्रा, शिवाजी मुखर्जी, स्वप्नकुमार लाहिरी उपस्थित होते. प्रारंभी पुलवामातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.बांगिया संस्कृती संसद ही पुण्यात ५३ वर्षे कार्यकर्त असलेली सामाजिक-सांस्कृतिक संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून बंगाली संस्कृती आणि साहित्याचा प्रसार केला जातो. रवींद्रनाथ टागोर यांच्या निवडक गाण्यावर आधारित ‘बसंत गीती’ या समर्पित कार्यक्रमात वसंत ऋतूतील रम्य सकाळच्या छटांचे विविध पैलू नृत्याद्वारे उलगडण्यात आले. ‘नबीन’ गीतनाटिकेतील रवींद्र संगीतातून सुंदर संगीत नृत्याची सांगड घालून वसंत ऋतूचे दर्शन या सांस्कृतिक कार्यक्रमातून घडविण्यात आले.सास्वती आणि श्रेया गुहा ठाकूर यांनी एकत्रित ‘तुमी माता तुमी कन्या’ कार्यक्रमातून ‘रबिन्द्र संगीत’ सादर करून वातावरण संगीतमय केले. त्यांना तबल्यावर श्रेष्ठ कलाकार बिप्लाब मोंडल आणि सिंथेसायझरवर सुब्रता मुखर्जी यांनी साथ सांगत केली. रवींद्रनाथ टागोरांच्या निवडलेल्या गाण्यांवर आधारित हा कार्यक्रम होता.

‘बसंतोत्सव सांस्कृतिक कार्यक्रम ज्यांचे मूळ गुरुदेव रवींद्रनाथ टागोरच्या जन्मस्थानी शांतीनिकेत आहे. ज्यामध्ये लोकांना एकत्र आणून विविध रंगरूपी आनंद आणि प्रेम देते,’ असे या कार्यक्रमाबद्दल बोलताना सुजाता पॉल म्हणाल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपंकर मुझुमदार यांनी केले. आभार सुबसिस बागल यांनी मानले.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search