Next
सरकारी तेल कंपन्यांसाठी तेल आणि गॅस क्षेत्रात भरती
प्रेस रिलीज
Saturday, March 30, 2019 | 02:12 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : भारतातील मुख्य टेक्निकल मॅनपॉवर आउटसोर्सिंग कंपन्यांपैकी एक असलेल्या आरव्हीएनकॉन लिमिटेडने भारत स्टेज (बीएस) सहा योजनेत सहभागी होत असलेल्या सरकारी तेल कंपन्यांसाठी तेल आणि गॅस क्षेत्रात जागांसाठी भरती सुरू केली आहे. भारत सरकारने तेल रिफायनरींना यूरो-सिक्स मानकांचे पालन करण्याच्या व बीएस-सिक्स स्वीकारण्याच्या सूचना दिल्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे.

बीएस-सिक्स हे सध्याच्या बीएस-फोर इंधन मानकांच्या तुलनेत अधिक कडक गुणवत्ता मानके पूर्ण करणारे एक अल्ट्रा क्लीन फ्यूएल आहे. या संक्रमणाचा अर्थ आहे, नवीन बीएस-सिक्स मानकांची पूर्तता करण्यासाठी १६ रिफायनरींमधून संचालन, मशीन आणि इन्फ्रास्ट्रक्चर चौकट अपग्रेड करणे आवश्यक आहे, ज्यासाठी दोन हजार इंजिनीअरिंग पदांवर भरती होणार आहे. ही भारती करण्यात ‘आरव्हीएनकॉन’ या कंपन्यांना मदत करेल.

या योजनांना गती देण्यासाठी, ‘आरव्हीएनकॉन’ रिफायनरी साइट्सवर कंत्राटदारांच्या देखरेखीसाठी योजना, डिझाइन आणि योजना तयार करण्यात तज्ज्ञ इंजिनीअर्सना नियुक्त करेल. रिफायनिंग कंपनी, पीएमसी आणि करार केलेल्या कंपन्यांना निर्धारित अवधीत आवश्यक अपग्रेडेशन पूर्ण करण्यासाठी प्रत्येक साइटवर सुमारे १००पेक्षा जास्त इंजिनीअर्सची गरज लागेल.

‘आरव्हीएनकॉन लिमिटेड’चे कार्यकारी संचालक जयदेव संघवी म्हणाले, ‘बीएस-फोर इंधनाऐवजी बीएस-सिक्स इंधनाचा अंगीकार करणे हे देशासाठी ग्रीनहाउस गॅसेस आणि हवेतील प्रदूषकांना कमी करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. या नव्या इंधन ग्रेडचा आरंभ तेल आणि गॅस उद्योगात होत असलेले मोठ्या स्तरावतील फेरफार दर्शवतो,ज्याचे नेतृत्व पेट्रोल आणि डिझेल क्षेत्र करते आहे कारण बहुतांशी प्रक्रिया या फ्यूएलशी संबंधित आहेत. पर्यावरणावर तर याचा प्रचंड प्रभाव पडेलच, पण त्याचबरोबर या स्विचओव्हरमुळे या क्षेत्रात अनेक नवीन नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. या मोहिमेत आणि देशभरातील तेल रिफायनरींमध्ये लोकांना कामावर ठेवण्याच्या प्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावताना आम्हाला आनंद होत आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search