Next
मित्सुबिशी इलेक्ट्रिक कप स्पर्धेत ‘डीकेटीई’चा संघ प्रथम
प्रेस रिलीज
Tuesday, February 26, 2019 | 04:27 PM
15 0 0
Share this article:

फरीदाबाद येथील मित्सुबिशी इलेक्ट्रिक कप २०१९ स्पर्धेत डीकेटीईच्या विजेत्या संघाला बक्षीस प्रदान करताना कात्सुनोरी उशीकु व मान्यवर.

इचलकरंजी : येथील ‘डीकेटीई’च्या इलेक्ट्रॉनिक्स विभागातील विद्यार्थ्यांनी मित्सुबिशी इलेक्ट्रिक सुवर्ण कप जिंकून एक लाखाच्या बक्षिसासहीत पदक आणि जपान देशाचा दौऱ्याचा मान मिळवला आहे. मित्सुबिशी इलेक्ट्रिक कप या स्पर्धेमध्ये विविध राज्यांतील एकूण १३५ प्रकल्पांमधून उत्कृष्ट ३५ प्रकल्प अंतिम फेरीसाठी निवडण्यात आले. या सर्व स्पर्धकांवर मात करीत ‘डीकेटीई’च्या स्पार्क या संघाने प्रथम क्रमांकाचे बक्षीस प्राप्त केले.

२०१६ पासून मित्सुबिशी इलेक्ट्रिक कप स्पर्धा दर वर्षी घेण्यात येत असते. या स्पर्धेला राष्ट्रीय स्तरावर विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. विद्यार्थ्यांच्या विविध कल्पना आणि मित्सुबिशी इलेक्ट्रिक कंपनीने दिलेल्या चालना यांचा सुंदर मिलाफ या स्पर्धेअंतर्गत दिसून येतो. ‘डिजिटल इंडस्ट्री थ्रू स्मार्ट इमॅजिनिशन’ अशा संकल्पनेने मित्सुबिशी इलेक्ट्रिक इंडिया आणि मानव रचना शैक्षणिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने यंदाची ही स्पर्धा फरीदाबाद (हरियाणा) येथे भरविण्यात आली होती.

या स्पर्धेत ‘डीकेटीई’च्या इलेक्ट्रॉनिक्समधील अथर्व पळसुले, प्रतीक खोंद्रे, रसिका कोले व समीक्षा पोतदार या विद्यार्थ्यांनी टीम स्पार्क नावाने सहभाग नोंदवला. यामध्ये गणिती संख्याकी आणि आधुनिक पीएलसी तंत्रज्ञान यांचा मेळ घालून ‘इंटेलिजन्ट ऑटोनॉमस रोबोट’ प्रकल्प बनविला. आपल्य ज्ञानाची आणि कौशल्याची चुणूक दाखवत या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत आपला ठसा उमटवला. विद्यार्थ्यांनी बनविलेला हा रोबोट सध्याच्या उदयोगधंद्यातील ऑटोमेशनच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असून, वेळेची बचत आणि उत्पादनवाढीसाठी याचा खूप उपयोग आहे. ऑटोमॅटिक कॉलिंग, पाथ ट्रॅकिंग अशा सुविधा यामध्ये पुरविण्यात आलेल्या आहेत याव्यतिरिक्त औदयोगिक विकासात हा प्रकल्प चांगला लौकिक निर्माण करू शकतो. या विद्यार्थ्यांना प्रा. विनोद कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले.  

स्पर्धेच्या बक्षीस वितरणाप्रसंगी ‘एआयसीटीई’चे व्हाइस चेअरमन डॉ. एम. पुनिया व मित्सुबिशी इलेक्ट्रिक इंडियाचे मुख्य संचालक कात्सुनोरी उशीकु, जपानच्या मित्सुबिशी इलेक्ट्रिक कॉर्पोरेशनचे मासानोरी तानीमोतो यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

‘या नाविन्यपूर्ण प्रोजेक्टसाठी अ‍ॅटोमेशन लॅबरोटरीतर्फे विद्यार्थ्यांना अशा प्रकारे यंत्रणा कार्यन्वित करण्याचे ज्ञान ‘डीकेटीई’मध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे याचा फायदा विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या क्षेत्रातील यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात होत आहे,’ असे माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी सांगितले.

‘विद्यार्थ्यांच्या कौशल्यामध्ये वाढ होण्यासाठी ‘डीकेटीई’मध्ये पीएलसी, एचएमआय, स्कॅडा ट्रेनिंगचे वेळोवेळी आयोजन केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना अशा स्पर्धेमध्ये अव्वल स्थान पटकविण्यास फायदा होतो,’ अशी माहिती डायरेक्टर प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले यांनी दिली.

संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, मानद सचिव डॉ. सपना अवाडे यांच्यासह सर्व ट्रस्टी, डे. डायरेक्टर डॉ यू. जे. पाटील, विभागप्रमुख डे.डायरेक्टर डॉ. एल. एस. आडमुठे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search