Next
‘ज्युपिटर’मध्ये नवजात बालकावर दुर्मिळ ओपन हार्ट सर्जरी
प्रेस रिलीज
Monday, January 21, 2019 | 04:36 PM
15 0 0
Share this article:

पुणे : येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये सहा दिवसांच्या नवजात बालकावर मोफत ओपन हार्ट सर्जरी करण्यात आली. या बालकाला जन्मताच ‘ट्रान्सपोसिशन ऑफ दी ग्रेट अर्टेरिएस’ हा हृदय विकार आढळून आल्याने त्याच्यावर हृदयस्पर्श या ज्युपिटर हॉस्पिटलच्या योजनेअंतर्गत तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली.

गर्भाशयात पूर्णपणे हृदयाचा विकास न झाल्याने ‘ट्रान्सपोसिशन ऑफ दी ग्रेट अर्टेरिएस’ हा अतिशय गंभीर व दुर्मिळ विकार होतो. या विकारात हृदयाच्या रक्तप्रवाहात बदल होतो; तसेच हृदयामार्फत शरीरात जाण्याऱ्या रक्तमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. या कमी ऑक्सिजन असलेल्या रक्तमुळे शरीराच्या अवयवांची हालचाल योग्यरित्या होत नाही. त्यामुळे रुग्णाचा मृत्यूदेखील होऊ शकतो.

या नवजात बालकमध्ये हा विकार आढळल्याने त्याला तातडीने शासकीय रुग्णालयातून ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. या वेळी याचे वजन दोन किलो होते. शस्त्रक्रिया केलेल्या बाळाच्या घरची आर्थिक परीस्थिती अतिशय हलाखीची आहे. ते मुळचे नेपाळचे असून, त्याचे वडील सुरक्षा रक्षकाचे काम करतात.

या विषयी बोलताना बाल हृदयरोग तज्ञ डॉ. अभिजित नाईक म्हणाले, ‘या बाळाची प्रकृती अतिशय चिंताजनक होती. त्यामुळे त्याच्यावर ‘आर्टेरिअल स्विच’ ही आपत्कालीन शस्त्रक्रिया करण्यात आली. अडीच किलोपेक्षा कमी वजन असलेया बाळांना या शस्त्रक्रियामध्ये १० टक्के जोखीम असते.’

बाल हृदयरोग तज्ञ डॉ. राहुल सराफ म्हणाले, ‘बालकांच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी पैसे उभे करणे ज्यांच्यासाठी अशक्य असते त्यांना ज्युपिटर फाउंडेशन, मुकुल माधव फाउंडेशन, ह्याव ए हार्ट फाउंडेशन, हृदयस्पर्शच्या माध्यमातून सहकार्य करते. यातून अनेक शत्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यास ज्युपिटर हॉस्पिटला यश आले आहे.’

ही शस्त्रक्रिया बाल हृदयरोग तज्ञ डॉ. अभिजित नाईक व डॉ. राहुल सराफ यांच्या टीमने यशस्वीरित्या पार पाडली. यामध्ये पाडियाट्रिक आयसीयूच्या डॉ. श्रीनिवास तांबे यांचादेखील समावेश होता. बाणेर ज्युपिटर हॉस्पिटलतर्फे ‘हृदयस्पर्श’ या बाल हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन आले आहे. या शिबिरातून जनजागृती व्हावी तसेच रुग्णांना सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधा पुरवण्यात याव्या हा मानस आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search