Next
हनुमान जन्मोत्सव साजरा
BOI
Saturday, March 31, 2018 | 02:23 PM
15 0 0
Share this story

सोलापूर : सोलापूर शहर आणि जिल्ह्यात आज (३१ मार्च) रोजी श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथील श्री हनुमान मंदिरातही हा उत्सव जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा झाला. भाविकांनी भल्या पहाटे श्रींवर पुष्पवृष्टी करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. 

श्रीराम नवमीपासून आज चैत्र पौर्णिमेपर्यंत दररोज मंदिरात धार्मिक कार्यक्रम होत होते. त्यात भजन, प्रवचने व कीर्तन आदी कार्यक्रमांचा समावेश होता. शनिवारी भल्या पहाटेपासूनच भाविकांनी हनुमान मंदिरात गर्दी केली होती. 

मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. रांगोळ्या व दीपमाळांनी मंदिर उजळून निघाले होते. अशा भक्तिमय वातावरणात पहाटे विश्वंभर महाराज कदम यांचे हनुमान जन्मोत्सव या आख्यानावर कीर्तन झाले. सूर्योदयावेळी भाविकांनी पुष्पवृष्टी केली. श्रींच्या आरतीनंतर महिला भाविकांनी श्रींचा नामकरण विधी केला. 

गव्हाची खीर व सांबर भाताच्या महाप्रसादाचे वाटप भाविकांना करण्यात आले. लहान मुलांनसाठी यात्रेतील करमणुकीचे खेळ आसल्यामुळे या जन्मोत्सव सोहळ्याला यात्रेचे स्वरूप आले होते. रविवारी (एक एप्रिल) नगर प्रदक्षिणा व भारुडाच्या कार्यक्रमाने हनुमान जन्मोत्सव सोहळ्याची सांगता होणार आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
श्री . विश्वंभर कदम , रोपळे बु . ता . पंढरपूर, जि . सोलापूर About 295 Days ago
बाईट्स ऑफ इंडियाने हनुमान जन्मोत्सव साजरा केल्याची बातमी प्रसिध्द केली . या निमीत्ताने देशभर नाही तर जगभर या उत्सहाची महती गेली . ग्रामीण भागातील कार्यक्रम जगभर दाखवला जातो . याचे आम्हाला कौतुक वाटते .
0
0

Select Language
Share Link