Next
दुष्काळग्रस्तांना पाणी, रोजगार व चारा छावण्या उपलब्ध
महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती
प्रेस रिलीज
Wednesday, June 19, 2019 | 05:09 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : राज्यात दुष्काळाची तीव्रता पाहता दुष्काळग्रस्त गावांना पिण्याचे पाणी, मनरेगाअंतर्गत रोजगार व जनावर आणि शेळ्या-मेंढ्यांसाठी चारा छावण्या उपलब्ध करण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी १८ जून २०१९ रोजी विधानपरिषदेत दिली.

सदस्य शरद रणपिसे यांनी राज्यात दुष्काळग्रस्तांना मदत देण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना ते बोलत होते. राज्यात १५१ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. या तालुक्यांसाठी चार हजार ९०९.५१ कोटी रुपये इतका निधी वितरित केला होता. त्यापैकी ६६.८८ लाख इतक्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रुपये चार हजार ४६१.२० कोटी रुपये इतका निधी वर्ग करण्यात आल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

‘दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी जमीन महसूल सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपांच्या चालू वीज बिलात ३३.५ टक्के सूट, शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयोअंतर्गत कामाच्या निकषांत काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तिथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकरचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे इत्यादी उपाययोजना केलेल्या आहेत. २०१९-२०साठी दुष्काळासाठी चार हजार ४७३ कोटी रुपये इतक्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. केंद्र सरकारने दुष्काळासाठी चार हजार ५६३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे,’ अशी माहिती पाटील यांनी दिली. 

‘जनावरांसाठी आवश्यक तिथे चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. राज्यात एक ६३५ चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. या वर्षी प्रथमच शेळ्या-मेंढ्यांसाठीही चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. राज्यात पाच हजार ५०६ गावांना सहा हजार ९०५ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. चारा छावण्याबाबत काही तक्रारी आल्यास त्याची चौकशी केली जाईल. दुष्काळग्रस्त गावातील विद्यार्थ्यांना शालेय व महाविद्यालयीन प्रवेश शुल्कात सूट देण्याबाबत शासन सकारात्मक विचार करेल,’ असे पाटील यांनी सांगितले.

या चर्चेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, कपिल पाटील, जयंत पाटील, रामहरी रूपनवर आदींनी सहभाग घेतला.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search