Next
‘युवकांनी तावडे समाजाचे कार्य आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यावे’
प्रेस रिलीज
Saturday, May 12 | 02:17 PM
15 0 0
Share this story

तावडे अतिथी भवनाचा लोकार्पण सोहळ्याप्रसंगी शिक्षणमंत्री विनोद तावडे, वर्षा तावडे, आमदार भास्कर जाधव, दिनकर तावडे आदी मान्यवर.

मुंबई : ‘क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळ या मंडळाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी एक इवल्याशा रोपट्याचे वटवृक्षामध्ये रूपांतर केले. तावडे मंडळाच्या कार्यकर्त्यांची जिद्द आणि चिकाटीमुळे तावडे अतिथी भवनसारखी दिव्य भव्य वास्तू आज दिमाखात उभी राहिली. भविष्यात तावडे मंडळाच्या युवा पिढीने पुढाकार घेऊन तावडे मंडळाच्या युवकांची शाखा अथवा मंडळ निर्माण करावे. युवकांच्या या मंडळाने मुंबई आणि राज्यापुरते मर्यादीत न राहता आपल्या समाजाचे काम आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचे उद्दिष्ट ठेवावे,’ असे आवाहन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले.

क्षत्रिय मराठा हितवर्धक मंडळाला ७५ वर्ष असून, क्षत्रिय मराठा हितवर्धक विवाह मंडळाला ५० वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून राजापूर तालुक्यातील आडिवरे गावी नव्याने बांधलेल्या तावडे अतिथी भवनाचा लोकार्पण सोहळा १० मे रोजी शिक्षणमंत्री तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शानदारपणे पार पडला. या प्रसंगी खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, माजी आमदार बाळ माने, क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळचे अध्यक्ष दिनकर तावडे, सरचिटणीस सतीश तावडे, खजिनदार शंकरराव तावडे, उपाध्यक्ष सुहास तावडे, उपाध्यक्ष राजेंद्र तावडे, अतिथी भवनाचे शिल्पकार आर्किटेक्ट संतोष तावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

‘त्रिवेणी संगम आणि तावडे समाजाचा आठशे वर्षांचा इतिहास असलेल्या वास्तूत सुमारे पंधरा हजार चौरस फूट बांधकाम असलेली बेसमेंट आणि दोन मजली इमारत असून, येथे राहण्यासाठी सुसज्ज आठ रूम, समोर सुंदर उद्यान सांस्कृतिक व सामाजिक केंद्र आदी सुविधा आहेत. येथे निसर्गाने मुक्त उधळण केलेली असून, पुरातन महाकाली मंदिर आणि निवासाची उत्तम सोय या वास्तुमुळे उपलब्ध झाल्याने येथे येणाऱ्या पर्यटकाना व भाविकांना एक पर्वणी ठरणार आहे; तसेच यापुढे ही वास्तू सर्वांसाठी मार्केट दराने, तर तावडे बंधूंसाठी माफक दारात उपलब्ध करून देण्यात येणार आहे,’ असे तावडे हितवर्धक मंडळांचे अध्यक्ष दिनकर तावडे म्हणाले.

‘तावडे हितवर्धक मंडळामार्फत युवकांनी आता पुढाकार घेऊन खऱ्या अर्थाने उद्योजक म्हणून पुढे यावे आणि उद्देशाने  नवीन उद्योजकांना पुढे आणण्यासाठी तावडे मंडळ प्रयत्नशील असेल व आपला प्रसार आणि आपले कार्य युवकांनी उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रात उमटवावे,’ अशा शुभेच्छा विनोद तावडे यांनी या प्रसंगी दिल्या. ‘ही वास्तू म्हणजे एक आजच्या युवकांसाठी आदर्श आहे. तावडे कुटुंबियांनीही आपल्या घरातील प्रत्येक शुभकार्य या तावडे अतिथी भवनात साजरा करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावा; तसेच या वास्तूचा दिमाखदारपणा जास्तीत लोकापर्यंत पोहचिविण्याच्या दृष्टीने या वास्तूचे चांगल्या पद्धतीने मार्केटिंग करून जास्तीत जास्त लोक या ठिकाणी कसे पोहचतील याचा विचार करावा’ असेही तावडे यांनी सांगितले.सतीश तावडे यांनी प्रास्ताविक केले. खासदार राऊत, आमदार जाधव यांचीही या प्रसंगी भाषणे झाली. आर्किटेक्ट संतोष तावडे व अध्यक्ष दिनकर तावडे यांनी आपले मनोगत या वेळी व्यक्त केले. या प्रसंगी क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळाच्या स्मरणिकेचे प्रकाशन विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आले.

(Please click here to read this news in English.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link