Next
भारतीय ‘ऑफलाइन’ बाजारपेठेत ‘पीट्रॉन’चा प्रवेश
प्रेस रिलीज
Monday, June 25, 2018 | 03:29 PM
15 0 0
Share this story

हैदराबाद : मोबाइल अॅक्सेसरीज ऑनलाइन विक्रीमध्ये भारतामध्ये पहिला क्रमांक पटकावणाऱ्या ‘पीट्रॉन’ कंपनीने आता ऑफलाइन बाजारपेठ काबीज करण्यासाठी एक विशेष योजना आखली आहे. या योजनेनुसार ‘पीट्रॉन’ने भारतामधील आपला सहावा मुख्य वितरक म्हणून ‘प्लेटाइम इलेक्ट्रॉनिक्स’ या कंपनीची नियुक्ती केली आहे. ही कंपनी हैदराबाद आणि तेलंगणा विभागातील काम पाहणार आहे.

‘पीट्रॉन’चे इतर पाच वितरक नवी दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद, पुणे आणि जयपूर येथे कार्यरत आहेत. अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीत ‘पीट्रॉन’ प्रॉडक्ट्सच्या एकूण वितरकांनी आता चाळीशीचा आकडा ओलांडला असून, देशभरातील १२ राज्यांमध्ये ही कंपनी कार्यरत आहे.

सध्याचे वितरण जाळे हे ७०० रिटेल आउटलेटपर्यंत पोचणारे असून, त्याद्वारे दर महिन्याला १५ हजार मोबाइल अॅक्सेसरीजची विक्री केली जाते. ‘पीट्रॉन’ने १२० वितरकांच्या नियुक्तीचे लक्ष्य आखले असून, त्याद्वारे चालू वित्तीय वर्षाअखेर दर महिन्याला ५० हजार मोबाइल अॅक्सेसरीजच्या विक्रीची योजना आहे. ऑफलाइन विक्रीमध्ये ‘सेल पॉईंट’सारख्या आजच्या काळातील मोबाइल रिटेलर विक्रेत्याचा समावेश असून, या कंपनीने ‘पीट्रॉन’चे प्रॉडक्ट्सच्या आपल्या केंद्रांवरून विक्रीस सुरुवात केली आहे.

‘पीट्रॉन’ने वितरण जाळे उभारण्यासाठी तीन कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे; तसेच अतिरिक्त दोन कोटींचा निधी हा रिटेल भागीदारांना पाठबळ देण्यासाठी मंजूर केला आहे. हे पाठबळ ब्रॅंड सक्षमीकरण आणि विविध मार्केटिंग उपक्रमांसाठी देण्यात येणार आहे.

‘प्लेटाइम इलेक्ट्रॉनिक्स’चे विनय पारवानी म्हणाले, ‘विविध पद्धतीची दर्जेदार प्रॉडक्ट्स आणि किफायतशीर मूल्यामुळे ‘पीट्रॉन’ प्रॉडक्ट्सना रिटेल केंद्रांवर ग्राहकांकडून अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला आहे.   

आंध्रप्रदेशमधील प्रमुख वितरक आणि ‘ग्राम सर्किट’चे श्रीधर एज्युपुगंती म्हणाले, ‘पीट्रॉन अॅक्सेसरीजने भारतामधील ऑनलाइन बाजारपेठेवर चांगला ठसा उमटवला आहे. त्यामुळे ‘पीट्रॉन’शी जोडले जाण्याचा आम्हाला आनंद आणि अभिमान आहे.’

‘पीट्रॉन’ने आतापर्यंत विविध ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे ग्राहकांपर्यंत ५० लाख वस्तू पोचविल्या आहेत. देशभरात सर्वात मोठी मोबाइल अॅक्सेसरीजची रेंज ‘पीट्रॉन’कडेच उपलब्ध असून, सातत्याने त्यात नवीन मॉडेल्सची भर पडत असते. त्यामुळे ऑडिओ चार्जर्स, वीअरेबल्स आणि ब्लु-टूथ प्रॉडक्ट्सचा समावेश आहे. आपल्या भक्कम डिझाइन टीमच्या सहकार्याने ‘पीट्रॉन’ने तीन ‘पेटंट्स’साठी अर्ज दाखल केला आहे. भारतामधील आपल्या ब्रॅंडला मिळालेले यश पाहून ‘पीट्रॉन’ची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश करण्याचीही योजना आहे.

‘पीट्रॉन’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमीन ख्वाजा म्हणाले, ‘पोर्टेबल मोबाइल अॅक्सेसरीज बाजारपेठेत इतरही काही कंपन्या कार्यरत असल्या, तरी दर्जा आणि किफायतशीर किंमत या दोन गोष्टींमध्ये ‘पीट्रॉन’ इतरांपेक्षा पुढे आहे. या कंपनीच्या प्रॉडक्ट्स ही ‘बीआयएस’ मानांकीत असून, त्यासाठी एक वर्षाची वॉरंटीही देण्यात आली आहे. सुरक्षा आणि विश्वासार्हता या दोन गोष्टींमुळे तरुणांकडून ब्रॅंडेड मोबाइल अॅक्सेसरीजला पसंती दिली जाते. हा वर्ग आमच्या प्रॉडक्ट्सचा ग्राहक आहे.’

(Please click here to read this news in English.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link