Next
चित्रप्रदर्शनातून समोर येणार ‘पंचमहाभुते’
प्रेस रिलीज
Tuesday, May 22 | 02:49 PM
15 0 0
Share this story

पुणे : आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी ही पंचमहाभूते अनादी काळापासून मनुष्याला आकर्षित करीत आली आहेत. हीच पाच तत्वे चित्रांमधून अनुभविण्याची संधी पुणेकर रसिकांना मिळणार आहे. निमित्त आहे नीलेश पवार यांच्या ‘एनर्जी’ या चित्रप्रदर्शनाचे. २४ ते २७ मे २०१८ या कालावधीत भांडारकर रस्त्यावरील आर्ट टू डे गॅलरी येथे सकाळी ११ ते सायंकाळी ६.३० या वेळेत हे प्रदर्शन होणार असून ते सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे.    

पवार यांनी स्प्रे पेंटिंगमध्ये केलेली पंचमहाभूतांची चित्रे आपल्याला या प्रदर्शनात पाहायला मिळतील. ज्यामध्ये या पाच तत्त्वांबरोबरच निसर्ग, कृष्ण यांचा समावेश असणार आहे. या पाच तत्वांचा स्वत: बरोबरच एकमेकांशी असलेला संबंध या चित्रांच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न पवार यांनी केलेला आहे हे विशेष.

बुधवार दि. २३ मे, २०१८ रोजी सायंकाळी सहा वाजता या प्रदर्शनीचे उद्घाटन होणार असून. अमर बिल्डरच्या व्यवस्थापकीय संचालिका शुभांगी मांजरेकर हे याचे उद्घाटन करतील. अमर बिल्डर्सचे व्यवस्थापकीय संचालक अमर मांजरेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील.

चित्रप्रदर्शन व उद्घाटनाविषयी :
उद्घाटन : बुधवार, २३ मे २०१८
वेळ : सायंकाळी सहा वाजता
दिवस : २४ ते २७ मे २०१८
वेळ : सकाळी ११ ते सायंकाळी ६.३०
स्थळ : आर्ट टू डे गॅलरी, भांडारकर रस्ता, पुणे

(Please click here to read this news in English.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link