Next
रोजगारप्रवण शिक्षण घेतले पाहिजे
विवेक वेलणकर यांचे प्रतिपादन
डॉ. अमोल वाघमारे
Sunday, June 30, 2019 | 12:00 AM
15 0 0
Share this article:



आंबेगाव :
‘आजच्या काळात पारंपरिक शिक्षण न घेता आधुनिक कौशल्यशिक्षण, रोजगारप्रवण शिक्षण घेतले पाहिजे. विद्यार्थ्यांनी इंग्रजीकडे दुर्लक्ष करू नये,’ असे प्रतिपादन पुण्याच्या सजग नागरिक मंचाचे संस्थापक आणि करिअर मार्गदर्शक विवेक वेलणकर यांनी केले. 

फलोदे (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथील शहीद राजगुरू ग्रंथालयात आयोजित करण्यात आलेल्या करिअर मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते. ग्रंथालयासह स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) आणि भारताचा लोकशाहीवादी युवा मंच (डीवायएफआय) या संघटनांच्या आंबेगाव तालुका समित्यांच्या संयुक्त विद्यमाने २८ जूनला हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. १० वी, १२ वी, पास-नापास व उच्च शिक्षण घेत असलेल्या व नसलेल्या अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.

‘आजच्या काळात पारंपरिक शिक्षणावर अवलंबून न राहता रोजगारप्रवण शिक्षण घेतले पाहिजे. आजच्या काळात इंग्रजी भाषा येणे हेदेखील उदरनिर्वाह करण्याचे एक महत्त्वाचे साधन आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी इंग्रजी शिकणे आणि ती व्यवहारात आणणे गरजेचे आहे,’ असे वेलणकर यांनी नमूद केले. 

१०वी व १२वी नंतर विद्यार्थ्यांनी कोणते करिअर निवडायला हवे आणि कोणत्या शिक्षणसंस्थांत त्यांना शिक्षण घेता येईल, याचे मार्गदर्शन त्यांनी केले. विद्यार्थ्यांच्या अनेक शंकांचेही निरसन त्यांनी केले. 

या मेळाव्याला फलोदे, सावरली, तळेघर, जांभोरी या गावातील मुले-मुली उपस्थित होती. या वेळी उपस्थित मुलामुलींना करिअर विषयाच्या अनुषंगाने एक महत्त्वपूर्ण पुस्तक व ‘युवासंघर्ष’ची प्रत भेट देऊन गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. 

या कार्यक्रमाला मनीषा मेमाणे (सरपंच, सावरली-फलोदे), अशोक पेकारी (किसान सभा, आंबेगाव तालुका समिती), राजू घोडे (किसान सभा, आंबेगाव तालुका समिती), मनोहर मेमाणे(उपसरपंच, फलोदे), सुभाष भोकटे (अध्यक्ष, डीवायएफआय, आंबेगाव तालुका समिती), गणेश काटळे (डीवायएफआय, आंबेगाव तालुका समिती), अविनाश गवारी (एसएफआय, आंबेगाव तालुका समिती), समीर गारे (सचिव, आंबेगाव तालुका समिती) उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर गारे यांनी केले. प्रास्ताविक अविनाश गवारी व आभारप्रदर्शन सागर पारधी यांनी केले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search