Next
महात्मा ज्योतीराव फुले यांची जयंती
प्रेस रिलीज
Thursday, April 12 | 02:45 PM
15 0 0
Share this story

मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) येथील प्रदेश कार्यालयात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीराव फुले यांची जयंती बुधवारी (११ एप्रिल) साजरी करण्यात आली. या वेळी भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार अतुल भातखळकर, प्रदेश कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांसह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

भातखळकर म्हणाले, ‘महात्मा फुले हे आद्य सामाजिक क्रांतिकारक होते. त्यांनी महिला शिक्षणाला सुरुवात केली. त्यांनी जातीपातींच्या पलीकडे जाऊन समतेचा विचार मांडला. महात्मा फुले यांचे समग्र वाङ्मय आता उपलब्ध झाले आहे. त्यामध्ये त्यांचे सर्व लेखन उपलब्ध आहे. त्यांच्या विचारांचा अभ्यास करून त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून चालण्याची गरज आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link