Next
शोभेच्या वस्तू, पाककृती बनवून विद्यार्थ्यांनी साजरा केला नारळ दिन
BOI
Thursday, September 06, 2018 | 09:15 PM
15 0 0
Share this article:

खोबऱ्यापासून बनवलेले खमंग कटलेट, केक आणि खीर.

रत्नागिरी :
नारळापासून अनेकविध शोभिवंत वस्तू, खोबऱ्यापासून चविष्ट, रुचकर खाद्यपदार्थ बनवून रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहा सप्टेंबर २०१८ रोजी जागतिक नारळ दिन साजरा केला. महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेला अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम होता. विद्यार्थ्यांनी नारळापासून ३० प्रकारच्या शोभेच्या वस्तू आणि केक, खीर, कटलेट, वड्या असे ५० चविष्ट खाद्यपदार्थ बनवले. या साऱ्यांचे प्रदर्शन लक्षवेधी ठरले. 

शोभेच्या वस्तू

विद्यार्थ्यांनी खोबऱ्यापासून वड्या, बर्फी, लाडू, घावन, कोकोनट कॉफी, आइस्क्रीम, मोदक, खाजे, सोलकढी, घारगे, नारळी भात, बाकरवड्या, खमंग भानूल असे अनेक पदार्थ बनवले. हे सर्व पदार्थ रुचकर झाल्याच्या प्रतिक्रिया परीक्षक प्रा. जी. एस. कुलकर्णी, डॉ. निधी पटवर्धन, प्रीती पाटील यांनी व्यक्त केल्या.नारळापासून बनविलेल्या शोभिवंत वस्तूंमध्ये ज्वेलरी बॉक्स, नेस्ट, कोकोपीट, डॉल, तबला, घुबड, लँप, थ्री डी सन, पॉट, फ्लॉवरपॉट आदींचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी कल्पकतेने या सर्व वस्तू बनवल्याचे दिसत होते. विजेत्यांना भाट्ये नारळ संशोधन केंद्राचे माजी संचालक डॉ. दिलीप नागवेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.

स्पर्धेचा निकाल
पाककृती स्पर्धा : सुकन्या ओलकर (सोलकढी/शहाळे भाजी), समीक्षा चव्हाण (नारळाची खीर), सुयोग रानटे (उपवासाचे कटलेट), उत्तेजनार्थ : योगिता आंबोले (लाडू), अलीना बोदले व दानिया मुल्ला (नारळ बर्फी)

शोभिवंत वस्तू : दानिया मुल्ला (वॉल हँगिंग), रजनीगंधा गोताड (नारळापासून घुबड), मैथिली बेंडके (दिवा), उत्तेजनार्थ योगिता भानगले (कँडल स्टँड).

(नारळापासून बनविलेल्या शोभिवंत वस्तूंच्या प्रदर्शनाची झलक, तसेच महाविद्यालयाच्या वनस्पतिशास्त्र विभागप्रमुख डॉ. मंगल पटवर्धन यांचे मनोगत सोबतच्या व्हिडिओत...)


 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
MAKARAND About
गाेगटे जाेगळेकर काॅलेजच्या वनस्पतीशास्त्र विभागाचा खूप छान उपक्रम अाहे. असा कार्यक्रम सर्वसामान्य जनतेसाठी घ्यावा. त्यामुळे अशा वस्तू बनवता येतात, हे सर्व लाेकांना कळेल.
0
0

Select Language
Share Link
 
Search