Next
‘वोक्हार्ट’तर्फे आयोजित ट्रॉफीचे मानकरी सातरस्ता बुल्स
प्रेस रिलीज
Tuesday, January 22, 2019 | 03:59 PM
15 0 0
Share this article:मुंबई : मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट रुग्णालय आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफीचे मानकरी सातरस्ता बुल्स हा डॉक्टरांचा संघ ठरला. नुकत्याच झालेल्या स्पर्धेत एकूण आठ संघाचा सहभाग होता व त्यात विविध स्पेशालिटीच्या तब्बल १४० डॉक्टरांनी मैदानावर आपल्यातील क्रीडागुणांचे कौशल्य एकमेकांसमोर आजमावले.

या स्पर्धेत ३५ ते ५५ या वयोगटांतील जनरल फिजिशियन, अस्थिविकार, हृदयविकार, मुत्रविकार, पोटविकार, बालविकार, स्त्रीरोग आदी विविध तज्ञ डॉक्टर्स सहभागी झाले होते. ही स्पर्धा भायखळा येथील जेठा कंपाउंडमधील कोर्टमध्ये पार पडली.

या स्पर्धेत दक्षिण मुंबई ते मध्य मुंबईतील डॉक्टर्सनी एकत्रित येऊन संघ तयार केला होता. यामध्ये वोक्हार्ट दबंग, भायखळा बॉइज, घाटकोपर टायगर, वरळी वॉल्व्ज या संघाचा समावेश अ गटात समावेश होता, तर ब गटात वोक्हार्ट धुरंदर, सातरस्ता बुल्स, साउथ सी लायन्स, ट्रॉफी फायटर्सचे होते. लिग क्रिकेटच्या नियमानुसार प्रत्येक संघ दोघांबरोबर खेळून जो अधिक मॅच जिंकला त्या संघाचे गुण अधिक या नियमानुसार सेमीफायनलमध्ये विरुद्ध गटासोबत खेळविण्यात आले.अंतिम सामना हा भायखळा बॉइज विरुध्द सातरस्ता बुल्स यांच्यात झाला. यामध्ये भायखळा बॉइजने सातरस्ता बुल्ससमोर आठ षटकांत ८५ धावांचे आव्हान उभे केले होते. हे आव्हान त्यांनी फक्त चारच षटकांत एक विकेटच्या बदल्यात सहज गाठले. या संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक धावा करत अंतिम फेरीत संघास विजयश्री खेचून आणल्याबद्दल डॉ. अजित कलवार यांना सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. ट्राफी फायटर्स हा संघ १५५ धावा पटकावत स्पर्धेतील सर्वाधिक धावसंख्या करणारा संघ ठरला. याच संघाचे खेळाडू डॉ. मिलिंद तोरसकर यांनी शतक ठोकले. वोक्हार्ट दंबंग संघाचे खेळाडू डॉ. निखील परुळेकर यांनी सहा चेंडूवर मास्टर स्ट्रोक मारत सहा षटकार झळकावले.

वोक्हार्ट रुग्णालयाचे सेंटर प्रमुख डॉ. पराग रिंधानी म्हणाले, ‘क्रिकेट हा असा खेळ आहे की जो कोणत्याही वयोगटातील अथवा क्षेत्रातील व्यक्तींना त्वरित जोडतो तसेच ताणतणाव दूर करण्यासाठी मदत करतो. डॉक्टर्स २४ तास रुग्ण सेवेत इतके व्यस्त असतात की त्यांना स्वत:साठी किंवा कुटुंबियांसाठीही वेळ देता येत नाही. रुग्णसेवाचा वसा घेतला असला, तरी स्वत: तणावमुक्त असल्याखेरीज दुसऱ्यांवर इलाज होऊ शकणार नाही आणि म्हणूनच वोक्हार्ट रुग्णालयातर्फे सर्वांना तणावमुक्त करत खेळाच्या मैदानावर मनमोकळेपणाने आपल्यातील खेळकर गुणांना प्रोत्साहन मिळावे म्हणून या स्पर्धेचे आयोजन केले होते. ज्यात सर्व डॉक्टरांनी खूप उत्साहपूर्वक सहभाग घेत हा दिवस संस्मरणीय केला.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search