Next
पीएन गाडगीळ अँड सन्सला ‘आयपीओ’साठी सेबीची मंजुरी
प्रेस रिलीज
Friday, July 20, 2018 | 04:12 PM
15 0 0
Share this story

मुंबई : पीएन गाडगीळ अँड सन्स या रिटेल जेम्स व ज्वेलरी कंपनीला प्रारंभी समभाग विक्री करण्यासाठी बाजार नियंत्रक सेबीकडून मंजुरी मिळाली आहे. पीएन गाडगीळ अँड सन्स या पुण्यातील रिटेल ज्वेलरी चेनने मे महिन्यामध्ये भांडवल बाजार नियामक सेबीकडे आयपीओसंबंधी कागदपत्र सादर केली.

आयपीओ कागदपत्रांनुसार, पीएन गाडगीळ अँड सन्सच्या खुल्या विक्रीमध्ये ५०० कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली जाणार आहे. कंपनीच्या शेअर्सची नोंदणी एनएसई व बीएसई येथे केली जाईल. एचडीएफसी बँक लिमिटेड आणि येस सिक्युरिटीज (इंडिया) लिमिटेड हे बुक रनिंग लीड मॅनेजर्स (बीआरएलएम) आहेत आणि लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड रजिस्ट्रार आहे.

पीएन गाडगीळ अँड सन्सच्या उत्पादनांमध्ये सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, मूर्ती व अन्य सिल्व्हरवेअर, हिरे व हिऱ्यांचे दागिने आणि अन्य जेमस्टोन्स ज्वेलरी व संबंधित भेटवस्तू यांचा समावेश आहे. ठिकठिकाणच्या प्रदेशातील ग्राहकांच्या पसंतीनुसार उत्पादने तयार करण्याची क्षमता आहे. कंपनी हाय-एंड मार्केट, मिड-मार्केट व व्हॅल्यू मार्केट सेग्मेंटमधील विविध ग्राहकांना सेवा देते आणि त्यासाठीची उत्पादने इन-हाउस क्रिएटिव्ह डिझाइनर टीमने तयार केलेली असतात. त्यामुळे अनेक व निरनिराळ्या प्रकारची डिझाइन उपलब्ध करणे शक्य होते. कंपनीकडे विशेष डिझाइन टीम असून, ही टीम ग्राहकांच्या गरजा पूर्ण करतील अशी नवी उत्पादने व डिझाइन तयार करते. कंपनीची महाराष्ट्रात २३ स्टोअर आहेत आणि गुजरात व कर्नाटक येथे प्रत्येकी एक स्टोअर आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link