Next
अघटित- असं फक्त इतरांच्या बाबतीत घडतं
BOI
Monday, March 26 | 10:48 AM
15 0 0
Share this story

सुरळीत सुरू असलेल्या आयुष्यात अचानक एक दिवस असा उजाडतो, की आयुष्यच बदलून जाते. काहीतरी वेगळेच घडते, अघटित. काहींना या अघटिताची चाहूल लागते. काहींना नाही. असे काही आपल्या बाबतीत घडू नये, असे वाटत रहाते. अशा घटनांचा मागोवा संदीप दांडेकर यांनी आपल्या कथांमधून घेतला आहे. या संग्रहात एकूण १२ कथा आहेत. विज्ञान, इतिहास, मानसशास्त्र आणि तत्त्वज्ञान यांवर आधारित काल्पनिक घटना त्यांनी या कथांमधून शब्दबद्ध केल्या आहेत.

‘लिव-इन’मधले प्रताप व नीलिमा, ‘मीती’ मधील मिलिंद, ‘कळस’मधील अरविंद, अर्जुन यांनी अशीच काही अघटिते अनुभवली. अघटित अनुभवताना कोणीही मुळापासून हादरून जाते. या कथाही अशाच हादरवणाऱ्या, धक्का देणाऱ्या आहेत. या कथेतील पात्रे आपल्या आसपास असणारी आणि आजच्या काळातील आहेत. त्यामुळे कथा परिणामकारक झाल्या आहेत.

प्रकाशक : राफ्टर पब्लिकेशन्स
पाने : २२८
किंमत : २५० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link