Next
संगीत निबंधावली
BOI
Saturday, May 26 | 11:06 AM
15 0 0
Share this story

संगीत विषयात रुची असणाऱ्यांना, संगीताच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त माहिती किरण फाटक यांच्या या पुस्तकातून मिळते. सूर आणि ताल आणि त्यांची एकत्रित मांडणी म्हणजे संगीत, असे ते सांगतात. शब्द नंतर येतात. संगीत आणि साधनेचा संबंध कसा असतो, याची माहिती दिल्यानंतर संगीत कला आणि शास्त्र यांचा परस्परसंबंध ते लावतात. पुढे गुरु-शिष्य परंपरा, संगीतातील घराणी, हिंदुस्थानी आणि दाक्षिणात्य संगीताची माहिती देतात. नंतर बंदिशीचे महत्त्व, आलाप, राग असा मुख्य अंगाने विषय स्पष्ट करतात.

वाद्ये आणि त्यांचे वर्गीकरण, गायनाच्या संगतीत वादनाचे असलेले महत्त्व, गीत स्वररचनांचे मुख्य नियम, ललित कलांमध्ये संगीताचे स्थान यांचा शोध घेऊन पार्श्वसंगीत, मैफील, संगीत संमेलने, वृंदगान, लोकसंगीत अशा विविध प्रकारांची माहिती देतात. याशिवाय रवींद्र संगीत, शिक्षणातील संगीत हा विषय आदींची माहितीही मिळते.

प्रकाशक : संस्कार प्रकाशन
पाने : १४४
किंमत : १२५ रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link