Next
आळंदीतील मुलांनी हिंगोलीत राबवली स्वच्छता मोहीम
धर्मवीर संभाजी महाराज वारकरी गुरुकुलाचा उपक्रम
BOI
Thursday, May 16, 2019 | 06:29 PM
15 0 0
Share this article:

हिंगोली : आळंदीतील धर्मवीर संभाजी महाराज वारकरी गुरुकुलातर्फे आत्मानंदगिरीजी महाराजांच्या प्रेरणेतून गांगलवाडी परिसरात स्वच्छ भारत अभियान आणि बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 

हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुक्यातील गांगलवाडी येथे गेले १५ दिवस सुरू असलेल्या या शिबिरात गुरुकुलातील मुले-मुली सहभागी झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात सुरू असलेल्या स्वच्छ भारत अभियानाबाबत जनजागृती करण्याचे काम या मुलांनी केले; तसेच या परिसरात त्यांनी स्वच्छता मोहीमही राबवली.   

स्वच्छ भारत अभियान संपूर्ण देशभरात राबविण्यात येत असून, त्यासाठी सरकार कोट्यवधी रुपये खर्च करत आहे, नुसता खर्च करण्यापेक्षा लोकांमध्ये जागरूकता निर्माण केल्यास लोक आपणहून या कामासाठी पुढाकार घेतील, या उद्देशाने गुरुकुलातर्फे हा उपक्रम राबविण्यात आला. कीर्तनकार श्यामजी महाराज, ह. भ. प. वैजनाथ महाराज, अध्यापक भगवान महाराज कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी गावात स्वच्छता मोहीम राबवली. कीर्तनातून स्वच्छतेचे महत्त्व लोकांना सांगण्यात आले. प्रभातफेरी काढून लोकांना स्वच्छ भारत अभियानाविषयी माहिती देण्यात आली. 

‘आत्मानंदगिरीजी महाराजांच्या प्रेरणेतून राबविण्यात येत असलेल्या या स्वच्छता अभियान जागरूकता मोहिमेपासून लोकांनी प्रेरणा घेतली पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांनी त्यात सहभाग घेतला पाहिजे तर आपला देश नक्कीच स्वच्छ आणि सुंदर बनेल,’ असे मत श्यामराज महाराज यांनी व्यक्त केले. 

आळंदीतील कीर्तनकार मंडळींनी आणि मुलांनी गांगलवाडी परिसरात येऊन स्वच्छ भारत अभियान आणि बालसंस्कार शिबिरासारखा अनोखा उपक्रम राबविला, त्याचे गावकऱ्यांनी खूप कौतुक केले आणि या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला. 

(मुलांनी केलेल्या जागृती मोहिमेचा आणि श्यामजी महाराज यांच्या मनोगताचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search