Next
‘कोटकांसारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज’
अॅड. शेलार यांचा ईशान्य मुंबई मतदारसंघातील मतदारांशी संवाद
प्रेस रिलीज
Thursday, April 18, 2019 | 12:04 PM
15 0 0
Share this article:मुंबई : ‘ईशान्य मुंबईतून मनोज कोटक यांच्या रूपाने शहरी भागाचा विकास आणि नियोजन या विषयातील तज्ज्ञ आम्ही उमेदवार म्हणून दिला असून, अशी व्यक्ती दिल्लीत गेल्यास त्याचा आपल्या मुंबईला निश्चित फायदा होईल,’ अशा विश्वास भारतीय जनता पक्षाचे (भाजप) मुंबई अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांनी व्यक्त केला आहे.

१७ एप्रिल २०१९ रोजी सकाळी मनोज कोटक यांच्या जनसंवाद यात्रेत ते सहभागी झाले होते. या वेळी त्यांनी मुलुंड रेल्वेस्थानक परिसरात रेल्वे प्रवाशांशी संवाद साधला. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना-रिपाई महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांच्या प्रचारार्थ मुलुंड रेल्वे स्थानक परिसरात जनसंपर्क यात्रेचे आयोजन केले होते. या वेळी ‘भाजप’चे मुंबई अध्यक्ष अॅड. शेलार व शिवसेनेचे नेते शिशिर शिंदे यांच्यासह स्थानिक नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.या वेळी बोलताना अॅड. शेलार म्हणाले, ‘मनोज कोटक यांनी आपल्या प्रचारात थेट जनसंवादावर भर दिला आहे. त्यांचा या भागातील जनसंपर्क अफाट असून, सकाळपासून आम्हाला त्याची प्रचिती येत आहे. रेल्वे स्थानक परिसरात ज्या पद्धतीने त्यांना मतदारांकडून प्रतिसाद मिळत आहे, ते पाहता त्यांचा विजय निश्चित आहे. फक्त कोटकच नव्हे, तर मुंबईतील आमचे सर्वच उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील.’

शिंदे म्हणाले, ‘मनोज कोटक यांच्या प्रचारात पहिल्या दिवसापासून शिवसेनेचा सक्रिय सहभाग आहे. मनोज यांचे वैशिष्ट्य म्हणजे यापूर्वी ते मुलुंड पश्चिमेच्या तीन वेगवेगळ्या वॉर्डातून महापालिकेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे निवडणूक कोणतीही असो त्यात त्यांचा कायमच दबदबा असतो. जनतेची सेवा आणि विकासाचा ध्यास असलेले नेतृत्व असे त्यांचे वर्णन करावे लागेल. त्यामुळे ईशान्य मुंबई मतदारसंघातून ते विजयाचा नवा विक्रम प्रस्थापित करतील.’कोटक यांनीही या वेळी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘आपल्या प्रचारात शिवसेना, ‘भाजप’ आणि ‘रिपाई’चे सर्वच कार्यकर्ते आणि पदाधिकारी सक्रिय सहभागी असल्याने त्याचा आपल्याला जरूर फायदा होईल. तसेच जनमानसही आमच्या बाजूने असून, मोदींना पुन्हा पंतप्रधानपदी बसवण्यासाठी लोक सज्ज आहेत.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search