Next
‘शासकीय गोदामांमध्ये इलेक्ट्रॉनिक वजनकाटा वापरा’
BOI
Friday, March 16, 2018 | 02:47 PM
15 0 0
Share this story

जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन करताना मान्यवर.सोलापूर : ‘यंदाच्या ग्राहक हक्क दिनाची ‘मेकिंग डिजीटल मार्केट प्लेसेस फेअरर’ ही संकल्पना आहे. ग्राहकांसाठी प्रामाणिक बाजारपेठ उपलब्ध झाली पाहिजे, यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने मागील चार वर्षांपासून प्रयत्न सुरू केले आहेत,’ अशी माहिती सोलापूर येथील अन्न-धान्य वितरण व जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमंत पाटोळे यांनी केले.

जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त होम मैदानात आयोजित कृषी महोत्सवादरम्यान पाटोळे बोलत होते. या वेळी व्यासपीठावर सहायक अन्न-धान्य वितरण व जिल्हा पुरवठा अधिकारी रमा जोशी, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक विजयकुमार बरबडे, सोलापूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य आनंद सागर, शोभना सागर, राष्ट्रीय ग्राहक पंचायतचे दीपक इरकल, शशिकांत हरिदास, निबंध स्पर्धेचे प्रायोजक राजेश फडकुले आदी उपस्थित होते.

या वेळी पाटोळे यांनी शासकीय गोदामांमध्ये वजनी काट्यांऐवजी इलेक्ट्रॉनिक वजनकाटा वापरण्याच्या सूचना केल्या. ते म्हणाले, ‘तंत्रज्ञानाचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ योग्य लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्यात येत आहे. सध्याचे युग डिजीटल बाजारपेठेचे आहे. ही बाजारपेठ पारदर्शी असली पाहिजे. यासाठी शासन प्रयत्नशील आहे. तंत्रज्ञानाचा वापर ग्राहकांच्या हितासाठी करण्यास शासनाने प्राधान्य दिले आहे.’

ग्राहक संरक्षण कायद्याची ग्राहकांमध्ये जागृती व्हावी म्हणून १५ मार्च रोजी साजऱ्या केल्या जाणाऱ्या जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त ग्राहक संरक्षण परिषदेतर्फे विविध कार्यक्रम आयोजित केले होते. सकाळी हुतात्मा चौक येथून ग्राहक जागृती रॅलीला सुरूवात झाली. विविध शासकीय अधिकारी, एसटी चित्ररथ तसेच सोलापूर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी विविध घोषणा देत ग्राहकांचे प्रबोधन व जागृती केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, डफरीन चौक, हरिभाई देवकरण प्रशाला मार्गे रॅली कृषी महोत्सावातील सभामंडपात विसर्जित झाली.

ग्राहक मंचातर्फे घेण्यात आलेल्या निबंध लेखन स्पर्धेच्या पुरस्कारांचे वितरण या प्रसंगी करण्यात आले. यामध्ये नंदिनी सीताफळे, मधुरा जेवरगी व कार्तिकी कदम यांना गौरवण्यात आले.

रमा जोशी यांनी प्रास्ताविक केले. शोभना सागर, शशिकांत हरिदास, दीपक इरकल आदींनी मनोगते व्यक्त केली. सुधीर जोशी यांनी सूत्रसंचालन केले. प्रसन्न सोनवणे यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
श्रीराम जोशी About
अम्मलबजावणी तातडीने व्हायला हवी
0
0

Select Language
Share Link