Next
विष्णुशास्त्री चिपळूणकर, भाऊराव मांडवकर
BOI
Sunday, May 20, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this article:

‘मराठी भाषेचे शिवाजी’ असं ज्यांना संबोधलं जायचं त्या विष्णुशास्त्री चिपळूणकरांचा आणि ‘कोलाम’ आदिवासींना जगासमोर आणणारे लेखक भाऊराव मांडवकरांचा २० मे हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
.....
विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर 

२० मे १८५० रोजी पुण्यात जन्मलेले विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर हे लेखक, समीक्षक, निबंधकार आणि भारतीय संस्कृती आणि समाजजीवन यांचे कट्टर पुरस्कर्ते म्हणून प्रसिद्ध होते. राजकारण, समाजकारण आणि साहित्य या तिन्ही क्षेत्रांत त्यांच्या लेखणीचा दबदबा मराठी मनांवर पडला होता. 

त्यांनी ‘निबंधमाला’ हे मासिक एकहाती लिहून सात वर्षं चालवलं होतं. त्यातून त्यांनी साहित्यविषयक लेखांबरोबरच ब्रिटिश राजसत्तेच्या अन्यायकारक धोरणांविरुद्ध टीकाही केली होती. समाजात काव्य आणि इतिहासाविषयी आवड निर्माण व्हावी, यासाठी त्यांनी ‘काव्येतिहास संग्रह’ नावाचं मासिकसुद्धा चालवलं होतं. 

शिक्षणाच्या प्रसारासाठी त्यांनी टिळक आणि आगरकरांबरोबर न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली होती. याचबरोबर चित्रशाळा, किताबखाना, आर्यभूषण छापखाना आणि फर्ग्युसन कॉलेज या संस्था स्थापन करण्यात त्यांचा पुढाकार होता. केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे त्यांनी चालू केली होती. 

विनोद आणि महदाख्यायिका, संस्कृत कविपंचक, सॅम्युएल जॉन्सन यांच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद, बाणभट्टाच्या ‘कादंबरी’ या संस्कृत पुस्तकाचा मराठी अनुवाद, निबंधमाला  आणि संपूर्ण अरेबियन नाइट्स (सहा भाग) असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. 

१७ मार्च १८८२ रोजी त्यांचं निधन झालं. 

(विष्णुशास्त्री चिपळूणकर यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.) 
...........

भाऊराव मारोती मांडवकर 

२० मे १९३० रोजी जन्मलेले भाऊराव मारोती मांडवकर हे कवी, कथाकार आणि कादंबरीकार म्हणून ओळखले जातात. ‘कोलाम’ या ग्रंथामधून त्यांनी कोलाम आदिवासींची जगाला ओळख करून दिली.

दुनन, रासुन्डा, पानोळ्या, चाळीस भावंडे, रानबोरे, करवंदे, राणीचा निवाडा, गळती, कुचंबणा, गजरा, चिंतनी आणि कोलाम, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. 

२७ एप्रिल २००८ रोजी त्यांचा मृत्यू झाला.

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search