Next
राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांना कीर्तनभूषण पुरस्कार
अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त गौरव; स्वरयात्रा कार्यक्रमाचे आयोजन
BOI
Monday, January 07 | 03:24 PM
15 0 0
Share this story

चारुदत्त आफळेपुणे : अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचा ४६वा वर्धापनदिन पुणे शाखेत मंगळवारी, आठ जानेवारी २०१९ रोजी साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांना ज्येष्ठ गायक, लेखक आनंद माडगूळकर यांच्या हस्ते कीर्तनभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 

साईनाथ मंडळाचे अध्यक्ष पीयूष शहा यांना सामाजिक कार्यासाठी आणि श्री महिला गृहउद्योग संस्था, लिज्जत पापड यांना सुवर्णमहोत्सव वर्षपूर्तीनिमित्त विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. 

पुरस्कार वितरण समारंभानंतर गदिमा, बाबूजी आणि पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्यावर आधारित ‘स्वरयात्रा’ हा कीर्तनाचा कार्यक्रम चारुदत्त आफळे सादर करणार आहेत. 

कार्यक्रमाविषयी :
अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचा वर्धापनदिन  
स्थळ : लोकमान्य सभागृह, केसरीवाडा, नारायण पेठ.
दिवस व वेळ : मंगळवार, आठ जानेवारी, सायंकाळी ४.४५ ते ७.४५  वा.

(कीर्तनसंध्या उपक्रमात चारुदत्त आफळे यांनी केलेल्या कीर्तनांचा सविस्तर वृत्तांत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link