Next
देवगावकर यांच्या ‘वॉटरप्रूफिंग’वरील पुस्तकाचे प्रकाशन
प्रेस रिलीज
Tuesday, April 16, 2019 | 01:21 PM
15 0 0
Share this article:

जयंत देवगावकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करताना डावीकडून अमृता देवगावकर, जयंत देवगावकर, श्रीकांत परांजपे, सुहास मर्चंट, मंदार देवगावकर आदी.

पुणे : जयसन्स कन्स्ट्रक्शन सोल्युशन्सचे अध्यक्ष जयंत देवगावकर यांनी लिहिलेल्या ‘वॉटरप्रूफिंग स्पेसिफिकेशन्स अॅंड मेथडॉलॉजी हॅंडबुक’ या पुस्तकाचे प्रकाशन क्रेडाई पुणे मेट्रोचे नवनिर्वाचित अध्यक्ष सुहास मर्चंट, क्रेडाई महाराष्ट्रचे उपाध्यक्ष श्रीकांत परांजपे यांच्या हस्ते पुण्यातील हॉटेल कॉनरॅड येथे झालेल्या कार्यक्रमात करण्यात आले.

बांधकाम करू इच्छिणाऱ्या सामान्य नागरिकांपासून ते अगदी बांधकाम व्यावसायिक, विकसक, वास्तुविशारद अशा सर्वांनाच ‘वॉटरप्रूफिंग’ची समस्या भेडसावत असते. याच समस्येवर ;पुस्तकात उपाय सुचविण्यात आले आहेत.

या पुस्तकाविषयी माहिती देताना देवगावकर म्हणाले, ‘रेरा कायद्याअंतर्गत सदनिका बांधून दिल्यानंतरही काही वर्षे बांधकामाच्या दर्जा व त्यासंबंधीचे दोष यासाठी विकासकाला जबाबदार धरले जाते. पाणी गळती ही सर्वांनाच कायम भेडसावणारी समस्या असून, योग्य रीतीने वॉटरप्रूफिंग केल्यास या समस्येवर यशस्वीरीत्या मात करता येते व बांधकामानंतर त्यासंबंधी येणाऱ्या ग्राहकांच्या तक्रारीला आळा बसू शकतो, हेच लक्षात घेत मी हे पुस्तक लिहिले आहे.’

‘‘वॉटरप्रूफिंग’ करण्याची क्रमाक्रमाने माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे; तसेच पुण्यात सध्या बेसमेंटमधील (तळमजल्याखालील मजले) ‘वॉटरप्रूफिंग’ची समस्या मोठी आहे. त्याविषयीदेखील या पुस्तकात मार्गदर्शन करण्यात आले आहे. सामान्यांपासून ते तज्ज्ञांपर्यंत सर्वांनाच उपयुक्त असे हे पुस्तक असून, नजीकच्या काळात ‘काँक्रीट फ्लोरिंग’विषयी सखोल माहिती देणारे पुस्तक मी काढणार आहे,’ असे देवगावकर यांनी सांगितले.

आदित्य जावडेकर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
R.K.ASS0 About 66 Days ago
where it is available n what is cost of book,pl give info about it
0
0

Select Language
Share Link
 
Search