Next
भाई वैद्य यांना श्रद्धांजली
प्रेस रिलीज
Wednesday, April 04 | 03:03 PM
15 0 0
Share this story

पुणे : ज्येष्ठ समाजवादी नेते, राज्याचे माजी गृहराज्यमंत्री भालचंद्र सदाशिव उर्फ भाई वैद्य यांचे दोन एप्रिल २०१८ रोजी निधन झाले. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि खासदार अनिल शिरोळे यांच्यातर्फे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

खासदार शिरोळे म्हणाले, ‘संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि गोवा मुक्ती लढ्यात भाईंचे यांनी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण आहे. मुल्यांवर निष्ठा ठेवूनही राजकारण करता येते हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले. आणीबाणीविरोधी लढ्यात ते खूप सक्रीय होते. त्यावेळी येरवडा जेलमध्ये असताना त्यांचा मला लाभलेला सहवास खूपच प्रेरणादायी ठरला. त्यांच्या निधनाने सामाजिक चळवळींची मोठी हानी झाली आहे.’

पालकमंत्री बापट म्हणाले, ‘ज्येष्ठ समाजवादी नेते व मानवतेची मूल्ये जतन करणाऱ्या भाई वैद्य यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अस्वस्थ झालो. भाईंनी लोकशाही मूल्ये जतन करण्याचे व्रत अंगिकारले होते. गोरगरिबांच्या हक्कासाठी सतत रस्त्यावर येऊन लढा उभा करणारे भाई पुणेकरांचे श्रद्धास्थान होते. स्वतंत्र सैनिक, गोवा मुक्ती आंदोलनातील नेता शिक्षण हक्कासाठी सत्याग्रह करणारा पुणेकरांचा मित्र आज आपल्यातून नाहीसा झाला आहे.’

‘महापौर या नात्याने त्यांनी पुणे शहराचा नावलौकिक सर्वदूर पोहचवला. राज्याचे गृहमंत्री या नात्याने त्यांची कामगिरी महाराष्ट्रातील जनतेच्या सदैव स्मरणात राहील. मराठवाडा विद्यापिठाचे नामांतर, पोलीस दलाचा बदललेला पोशाख, सेवानिवृत्तांना त्यांनी मिळवून दिलेला आर्थिक लाभ महाराष्ट्रातील जनता कधीच विसणार नाही. भाई वैद्य यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली’, अशा भावना बापट यांनी व्यक्त केल्या.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link