Next
भारताचे पहिले कनेक्टेड कार सोल्यूशन बाजारात
प्रेस रिलीज
Friday, December 22 | 04:43 PM
15 0 0
Share this story

डॉ. नागेंद्र पाल्लेमुंबई : महिंद्रा फर्स्ट चॉईस व्हील्स लिमिटेड (एमएफसीडब्ल्यूएल) या भारतातील पहिल्या क्रमांकाच्या मल्टी-ब्रँड सर्टीफाईड युज्ड कार कंपनीने प्री-ओन्ड कार मार्केटमध्ये पहिलेवहिले ‘कनेक्ट फर्स्ट’ हे कनेक्टेड कार डिव्हाईस बाजारात आणले आहे.

याची संकल्पना ‘एमएफसीडब्ल्यूएल’ची असून हे उपकरण विप्रो लिमिटेड या अग्रगण्य ग्लोबल इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी, कन्सलटींग आणि बिझनेस प्रोसेस सर्व्हिस कंपनीने विकसित केले. कनेक्ट फर्स्ट हे देशातील ७००हून अधिक शहरांमधील एक हजार ५००हून अधिक ‘एमएफसीडब्ल्यूएल’ फ्रेंचायजी आउटलेटमध्ये उपलब्ध असेल.
 
कनेक्ट फर्स्ट हे एक इंटेलिजंट कनेक्टेड सोल्यूशन असून त्यामुळे कारच्या मालकाला वाहनासोबत संवाद साधणे शक्य होते. मोबाईल अॅपच्या साथीने कनेक्ट राहता येते. हे अॅप आयओएस आणि अँड्रॉईडवर उपलब्ध आहे. काही दर्जेदार वैशिष्ट्यांसोबत ते कार मालकांना सुरक्षा, गहाळ होण्यापासून प्रतिबंध, सुविधा, देखभाल आणि ड्रायव्हिंग अॅनॅलेटीक्स एकाच मंचावर उपलब्ध करून देते. हे चपट्या आकारातील उपकरण निरनिराळ्या ब्रँड्सच्या २००हून अधिक कार प्रकारांशी निगडीत आहे व कारच्या ओबीडी पोर्टसोबत सहज प्लग्ड इन करता येण्यासारखे आहे. त्यामुळे चालकाला अतिरिक्त कार्यांचा अॅक्सेसही मिळतो.  
 
‘वाहन क्षेत्रात नव्या तंत्रज्ञानामुळे क्रांतीची नवीन लाट आल्याने आपल्या ड्रायव्हिंगची पद्धत बदलत आहे. प्री-ओन्ड कार मालकांना ही सुविधा उपलब्ध नसण्याचे आता कारणच उरलेले नाही. महिंद्रा फर्स्ट चॉईस व्हील्सचे लक्ष्य प्री-ओन्ड कार मालकांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाने कल्पक पर्याय पुरविण्याचे आहे, ज्यामुळे मालकी आणि चालक अनुभवाची मजा घेता येईल व नवीन कार मालकांप्रमाणे ही समाधानकारक बाब ठरेल. आमच्या या प्रयत्नात ‘विप्रो’ची भागीदारी असल्याने आनंद वाटतो,’ असे महिंद्रा फर्स्ट चॉईस व्हील्स लिमिटेडचे एमडी आणि सीईओ डॉ. नागेंद्र पाल्ले यांनी सांगितले.
  
‘तंत्रज्ञानयुक्त कल्पकता ही वाहन क्षेत्राला मिळालेले वरदान आहे. त्यामुळे ग्राहकांना सुरळीत आणि आगळावेगळा अनुभव मिळेल. एका नव्या व्हॅल्यू इकोसिस्टीमची ही सुरुवात म्हणता येईल. ‘विप्रो’ला ‘महिंद्रा’च्या कनेक्टेड कारच्या या प्रयत्नात भागीदारीचा आनंद आहे. ज्यामुळे ग्राहकाला सुरळीत चालक अनुभव मिळेल. याला आयओटी टेलीमॅटीक्स, अॅनॅलेटीक्स, आणि वास्तविक वापरकर्त्याला मोबाईल-वेब अॅप्लिकेशन आणि व्हॉइस इंटरफेसची जोड आहे. विप्रो ऑटोसाईट मंच हा कनेक्ट फर्स्ट चॉईसचा कणा आहे,’ असे विप्रो लिमिटेडच्या इंडिया बिझनेस युनिटचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्रीनाथ ए. व्ही. म्हणाले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link