Next
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी
‘राष्ट्रवादी’, काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट
प्रेस रिलीज
Tuesday, November 20, 2018 | 12:50 PM
15 0 0
Share this article:



मुंबई : ‘हिवाळी अधिवेशनाचा कालावधी केवळ आठ दिवसांचा असल्याने जनतेचे प्रश्न त्यातून मार्गी लागणार नाहीत. त्यामुळे या अधिवेशनाचा कालावधी वाढवून तीन आठवडे करावा,’ अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व विरोधी पक्षांच्या प्रतिनिधींनी राज्यपालांची १९ नोव्हेंबर रोजी भेट घेऊन केली. या वेळी राज्यपालांनी आपण स्वतः याप्रकरणी आपण लक्ष घालू असे सांगून, तुम्हीही विरोधी पक्ष म्हणून कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीची मागणी करून सरकारकडे ही मागणी करण्याचे सूचित केले.

‘मुंबईमध्ये होत असलेल्या हिवाळी अधिवेशनात केवळ आठ दिवसांचे कामकाज होणार आहे. त्यात राज्यातील भीषण दुष्काळ, मराठा-धनगर-मुस्लिम-लिंगायत आरक्षण, सिंचन, कायदा व सुव्यवस्था, कुपोषण, बालमृत्यू, भारनियमन, ढासळलेली आर्थिक स्थिती, शासकीय यंत्रणेतील भ्रष्टाचार यासंबंधीची चर्चा होणे शक्य नाही. याशिवाय एकूण २० विधेयकांवर चर्चा होणार असल्याने कोणत्याच विषयाला न्याय मिळणार नाही. त्यामुळे हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढविण्याचे निर्देश सरकारला द्यावेत,’ अशी मागणी विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केली.

या शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, लोकभारतीचे आमदार कपिल पाटील आदींसह दोन्ही पक्षांचे बहुतांश आमदार उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search