Next
सफाई कामगार असलेले कवी हरिश्चंद्र धिवार यांना विश्वशांतिदूत पुरस्कार जाहीर
मिलिंद जाधव
Tuesday, September 25, 2018 | 04:32 PM
15 0 0
Share this story

मुंबई : मुंबईमध्ये सफाई कामगार म्हणून कार्यरत असणारे, मात्र फावल्या वेळेत समाजप्रबोधन करणाऱ्या कविता लिहिणारे हरिश्चंद्र धिवार यांना यंदाचा विश्वशांतिदूत राज्य पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. येत्या सहा ऑक्टोबर २०१८ रोजी यवतमाळ जिल्ह्याच्या नेरसोपंत तालुक्यातील तंबाखेनगर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना पुरस्कार दिला जाणार आहे.

सामाजिक, कला, शिक्षण, पर्यावरण अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या नागरिकांना यवतमाळ जिल्ह्यातील नेरसोपंत येथील क्रांतिज्योती महिला बहुउद्देशीय शिक्षण संस्था आणि विश्वशांतिदूत परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वशांतिदूत राष्ट्रीय व राज्य पुरस्कार दिला जातो.

कवी हरिश्चंद्र धिवार हे मुंबई महानगरपालिकेत बांद्रा पश्चिम विभागात सफाई कामगार या पदावर काम करतात. ते फावल्या वेळेत कविता लिहितात आणि त्यातून समाज प्रबोधनाचे काम करतात. पुरस्काराची बातमी मिळताच कवी हरिश्चंद्र धिवार यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 

‘कचरा साफ करता करता अनेक शब्दही गोळा करत गेलो आणि कविता लिहीत गेलो. या पुरस्काराने माझ्यासारख्या कवीला लिहिण्यास अणखी हुरूप येणार आहे,’ असे कवी हरिश्चंद्र धिवार यांनी सांगितले. गुजरातमधील वंदे मातरम मंच संस्थेकडूनही कवी हरिश्चंद्र धिवार यांना पुरस्कार जाहीर झाला असून, येत्या ऑक्टोबर महिन्यात हा पुरस्कार नाशिक येथे त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Archana Doshi About 149 Days ago
Very nice congratulations jiju...😊
0
0

Select Language
Share Link