Next
‘हरटेक हॅकॅथॉन’ला उत्स्फू्र्त प्रतिसाद
प्रेस रिलीज
Tuesday, June 18, 2019 | 11:07 AM
15 0 0
Share this article:


पुणे : ‘डब्ल्यू स्क्वेअर’ या भारतातील आघाडीच्या को-वर्किंग व इनक्युबेशन सेंटरतर्फे महिलांसाठी हरटेक हॅकॅथॉन हे भारतातील पहिले एआय हॅकॅथॉन आयोजित करण्यात आले होते. मार्च ते जून २०१९ दरम्यान देशपातळीवर सुरू असलेली ही मोहिम पुणे, बेंगळुरू, हैदराबाद, गुरगाव या चार शहरांत आयोजित करण्यात आली होती. पुण्यात ही हॅकॅथॉन ‘डब्ल्यू स्क्वेअर’तर्फे फेसबुकच्या सहकार्याने थॉटवर्क्स येथे झाली. 


सहभागी स्पर्धकांनी शिक्षण व शेतीविषयक अभिनव सोल्युशन्स सादर केले. या दोन दिवसीय हॅकॅथॉनमध्ये १७०हून अधिक स्पर्धकांसह आघाडीच्या ४०संघांनी परीक्षक मंडळासमोर आपले सोल्युशन्स सादर केले. परीक्षक मंडळांनी तीन विजेते निवडले. यात लीना भंडारी यांच्या ‘लेव्हल अप’, स्नेहा शिंदे यांच्या ‘दी टीमकर’ आणि दीपा शेट्टी यांच्या ‘एस्टीमेटर्स’ या संघांचा सहभाग आहे. विजेत्यांना ‘वन फोर्थ लॅब्स’तर्फे एआय आणि एमएलमध्ये फ्री कोर्सेस, थॉटवर्क्सच्या वापसी मोहिमेत सहभाग व फेसबुक एआय टीमचे मार्गदर्शन मिळणार आहे.


‘वर्ल्ड इकोनॉमिक फोरम जेंडर गॅप’च्या अहवालानुसार जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स व्यावसायिकांपैकी फक्त २२ टक्के महिला आहेत. २०१५ ते २०१७दरम्यान एआय कौशल्य असलेल्या कर्मचार्‍यांमध्ये १९० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तंत्रज्ञान क्षेत्रात एआय स्पेशालिस्ट हे सर्वांत जास्त पैसे कमविणार्‍यांपैकी एक आहेत; मात्र या क्षेत्रात महिला व्यावसायिकांची संख्या कमी राहिल्यास ही दरी वाढत जाईल. यासाठीच ‘डब्ल्यू स्क्वेअर’ने फेसबुकच्या सहकार्याने थॉटवर्क्स येथे या उपक्रमाचे आयोजन केले होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search