Next
‘कोकण विकासाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करावे’
‘जगातील अर्थसत्तेचा केंद्रबिंदू : कोकण’ परिसंवादातील सूर
BOI
Thursday, November 01, 2018 | 01:21 PM
15 0 0
Share this story

‘ग्लोबल कोकण फेस्टिव्हल’मध्ये आयोजित कोकण विकासाविषयक परिसंवादात (डावीकडून) संजय यादवराव, ललीत महाडेश्वर, राजीव पाटील, किशोर धारिया सहभागी झाले होते.

पुणे : मुंबईचा केंद्रबिंदू कोकणाकडे सरकत असल्याने कोकण विकास सुनियोजित होण्यासाठी कोकण विकासाचे, कोकण विभागाचे व्हिजन डॉक्युमेंट, विकास आराखडा आणि विभागीय आराखडा तयार करावा, त्या प्रक्रियेत तज्ज्ञांना घ्यावे, असा सूर ‘जगातील अर्थसत्तेचा केंद्रबिंदू : कोकण’ या विषयावरील परिसंवादात उमटला.

‘ग्लोबल कोकण फेस्टिव्हल’च्या पूर्वसंध्येला ‘जागतिक अर्थसत्तेचा केंद्रबिंदू भारत, भारतीय अर्थसत्तेचा केंद्रबिंदू कोकण’ या परिसंवादात अनेक अपेक्षा व्यक्त झाल्या. 
अध्यक्षस्थानी ‘ग्लोबल कोकण फेस्टिव्हल’चे अध्यक्ष संजय यादवराव होते. बुधवारी, ३१ ऑक्टोबर रोजी मगरपट्टा सिटी येथील लक्ष्मी लॉन्सवर झालेल्या या परिसंवादात  सिडकोचे नगररचनाकार दिनकर सामंत, वसई -विरारचे पहिले महापौर राजीव पाटील, अमेरिकेतून खास महोत्सवाला आलेले उद्योजक ललित महाडेश्वर, संजय यादवराव, उद्योजक किशोर धारिया आदी अनेक मान्यवर सहभागी झाले होते. 

दिनकर सामंत म्हणाले, ‘बंदरे, रस्ते, विमानतळ, रेल्वेने कोकण जोडले जात आहे. खनिजे, निसर्ग, शेती, पर्यटन,  याने कोकण समृद्ध आहे. नगररचनाशास्त्राच्या दृष्टीने सुनियोजित विकास झाला पाहिजे. रोजगार, पर्यटन वाढवले पाहिजे. विस्थापन रोखले पाहिजे.’ 

संजय यादवराव म्हणाले, ‘भारत महासत्ता होताना, मुंबई- कोकणचे महत्व वाढत आहे. विकासाचा केंद्रबिंदू कोकणात सरकत आहे. आता चाकरमानी मानसिकतेतून कोकण वासियांना बाहेर काढून उद्योजकतेकडे नेले पाहिजे. ग्लोबल कोकण त्यासाठी व्यासपीठ उभे करेल.’ 

राजीव पाटील म्हणाले, ‘नैसर्गिक साधन संपत्ती जपून पर्यटन वाढवले पाहिजे. कोकणच्या खादयसंस्कृतीला उत्तेजन द्यावे. एकाच प्रकारचा उद्योग सर्वांनी करण्यापेक्षा वैविध्यपूर्ण व्यवसाय करावे.’ 

उद्योजक ललीत महाडेश्वर म्हणाले, ‘सिलिकॉन व्हॅली, बोस्टन, सिंगापूर, दुबईप्रमाणे मुंबई - कोकण पट्टा अर्थसत्तेचे केंद्र व्हावे,हे सुंदर स्वप्न आहे. त्यासाठी वेगवेगळी उत्पादने, सेवा उद्योग तयार झाले पाहिजेत. संपत्ती निर्मितीसाठी बौद्धिक क्षमता वृद्धिंगत केल्या पाहिजेत.’ 

धारिया म्हणाले, ‘कोकणाकडे रिव्हर्स मायग्रेशन झाले पाहिजे. त्यासाठी पुण्यातील जनरेशन नेक्स्टने पुढाकार घ्यावा. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link