Next
‘सोमानी सिरॅमिक्स’तर्फे पुण्यात अनुभूती केंद्र स्थापन
प्रेस रिलीज
Monday, June 18, 2018 | 04:36 PM
15 0 0
Share this story

‘सोमानी सिरॅमिक्स’तर्फे पुण्यामध्ये सुरू करण्यात आलेल्या अनुभूती केंद्राच्या स्थापनेप्रसंगी दीपप्रज्वलन करताना मीनल सोमानी आणि अभिषेक सोमानी.पुणे : सोमानी सिरॅमिक्स लिमिटेड या भारतीय सिरॅमिक उद्योगातील आघाडीच्या कंपनीने पुण्यामध्ये आपले खास अनुभूती केंद्र स्थापन केले असून, त्याद्वारे महाराष्ट्रातील आपल्या रिटेल कार्यविस्ताराचा श्रीगणेशा केला आहे. कोरेगाव येथील सुयोग प्लॅटिनम टॉवर या मध्यवर्ती ठिकाणी स्थापन करण्यात आलेल्या या शोरूमचे उद्घाटन सोमानी सिरॅमिक्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अभिषेक सोमानी यांच्या हस्ते करण्यात आले.

चार हजार ५०० चौरस फूट जागेत विस्तारलेल्या सोमानी अनुभूती केंद्रामध्ये समर्पित आणि अत्यंत कुशल अशी टीम असून, ती कार्यक्षम विक्री आणि वेळेवर सेवा या दोन्हीची दक्षता घेणार आहे. सर्व प्रकारच्या ग्राहकांच्या सर्व प्रकारच्या विविध घरगुती गरजांची पूर्तता या केंद्रात एकाच छताखाली होऊ शकणार आहे; तसेच टाइल्स आणि बाथवेअर या श्रेणींमध्ये तंत्रज्ञानाने विकसित उत्कृष्ट डिझाइन्स आणि अॅप्लिकेशन्स यांची विशाल मालिका येथे उपलब्ध होणार आहे.

‘सोमानी सिरॅमिक्स’च्या दर्जेदार उत्पादन मालिकेतील भिंती आणि जमिनीसाठीच्या सिरामिक टाइल्स, पॉलिश्ड व्हीट्रीफाइड टाइल्स, ग्लेझ्ड व्हीट्रीफाइड टाइल्स, डिजीटल टाइल्स आणि सॅनिटरी उत्पादने व न्हाणीघरातील उपकरणे या केंद्रामध्ये ग्राहकांना मिळणार आहेत.

उद्घाटनप्रसंगी बोलताना ‘सोमानी सिरॅमिक्स’चे व्यवस्थापकीय संचालक अभिषेक सोमानी म्हणाले, ‘सोमानी सिरॅमिक्ससाठी आम्ही प्रगतीचे जे एकंदर धोरण निश्चित केले आहे, त्यामध्ये या नेटवर्क विस्ताराची अतिशय मोलाची आणि धोरणात्मक भूमिका आहे. वेगाने वाढत्या रिअल इस्टेट क्षेत्रामुळे पुणे ही आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बाजारपेठ असून, आगामी काळात या शहरामध्ये गुंतवणुकीच्या आणि विकसनाच्या बहुविध संधी आमच्या डोळ्यासमोर आहेत.’

‘सोमानी अनुभूती केंद्राच्या स्थापनेद्वारा आम्ही हे शहर आणि या राज्यातील ग्राहकांना सर्वोत्तम आणि अद्ययावत रिटेल अनुभूती मिळवून देण्याची आमची बांधिलकी अधोरेखित केली आहे. आमच्या नियोजित नेटवर्क विस्तार योजनेअंतर्गत याच महिन्यात बंगळूर येथे सोमानी अनुभूती केंद्र स्थापन करण्याची आमची योजना आहे,’ असे सोमानी यांनी नमूद केले.

‘सोमानी सिरॅमिक्स’ने आपल्या सातत्यपूर्ण इनोव्हेशन आणि पुनर्शोध कार्याद्वारे प्रगतीचा आलेख चढता ठेवलेला आहे. भारतातील आपल्या १५ हजारांहून अधिक केंद्रांमुळे हा ब्रँड देशाच्या सिरामिक क्षेत्रातील सर्वाधिक विशाल नेटवर्क असलेला ब्रँड बनला आहे. आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये देखील हा ब्रँड आपली कार्यविस्ताराची योजना धडाक्यात पुढे राबविणार असून, देशभरात १५० हून अधिक फ्रँचायझी शोरूम्स, तसेच कंपनी संचलित अनुभूती केंद्रे सुरू केली जाणार आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link