Next
‘भारिप’च्या तालुकाध्यक्षपदी गंगाधर वाघमारे
नागेश शिंदे
Monday, July 29, 2019 | 12:40 PM
15 0 0
Share this article:


हिमायतनगर : मागील अनेक वर्षांपासून आंबेडकरी विचारधारा घेऊन काम करणारे गंगाधर वाघमारे यांची भारिप बहुजन महासंघ हिमायतनगर तालुकाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली असून, त्यांना वरिष्ठांच्या हस्ते निवडीचे पत्रही देण्यात आले आहे.

हिमायतनगर तालुक्यात आंबेडकरी विचारधारा रुजविण्यासाठी मागील तीन दशकांपासून गंगाधर वाघमारे यांनी आपले आयुष्य खर्ची घातले आहे. त्यांच्या कार्याची, पक्षाप्रती असणारे निष्ठेची, आणि अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची बांधिलकी लक्षात घेऊन भारिप बहुजन महासंघाच्या नांदेड जिल्हा कमिटीने त्यांना नियुक्तीपत्र देऊन तालुकाध्यक्ष म्हणून घोषित केले आहे. त्यांच्या निवडीचे पत्र नांदेड जिल्हा पक्षनिरीक्षक प्रा. राम घारकर यांच्या उपस्थितीत प्रा. यशपाल भिंगे, जिल्हाध्यक्ष मोहन राठोड, महासचिव श्याम कांबळे, बालाजी खर्डे पाटील, बाळासाहेब सोनकांबळे, पप्पू कुर्तडीकर, डॉ. उत्तमराव शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले. 

वाघमारे यांची तालुकाध्यक्षपदी निवड होताच तालुक्यातील पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, वाघमारे यांच्या मागील तीन दशकांपेक्षा अधिकच्या काळातील चळवळीतील अनुभवाचा फायदा पक्षाला निश्चित होणार आहे. त्यांच्या निवडीचे स्वागत हिमायतनगर येथील जेष्ठ पत्रकार प्रकाश जैन, परमेश्वर गोपतवाड, दिलीप शिंदे, नागेश शिंदे, विशाल हनवते, गोविंद गोखले, रविराज दूधकावडे, सलीम कुरेशी, पुंडलिक कदम, मारुती कदम, फकीर अहमद, राजू वाठोरे, संतोष खिल्लारे, पांडुरंग दुधाडे, शे.खयूम भाई, रईस भाई यांच्यासह अनेकांनी केले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search