Next
ठाण्यात आंबा महोत्सवाचे आयोजन
BOI
Tuesday, April 30, 2019 | 12:21 PM
15 0 0
Share this article:

ठाणे : मुंबई आणि उपनगरांतील ग्राहकांना कोकणातील अस्सल हापूस आंब्यांची चव चाखता यावी या हेतूने संस्कार व कोकण विकास प्रतिष्ठान यांच्या वतीने आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव एक ते १० मे २०१९ या कालावधीत राम मारुती नौपाडा येथील न्यू इंग्लिश शाळेच्या पटांगणात भरविण्यात येणार आहे. 

कोकणातील आंबा उत्पादकांना थेट बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून प्रतिष्ठानतर्फे दर वर्षी या महोत्सवाचे आयोजन केले जाते. या हंगामात बाजारात कर्नाटकचा आंबाही मोठ्या प्रमाणात दाखल होतो. तो हापूस आंब्यासारखाच दिसतो; मात्र त्याची चव वेगळी असते. काही वेळा कर्नाटकी आंबा हापूस आंबा असल्याचे सांगून ग्राहकांची फसवणूक केली जाते. ग्राहकांची अशी फसवणूक होऊ नये आणि कोकणातील अस्सल रत्नागिरी हापूस, देवगड हापूसची चव ग्राहकांना थेट चाखता यावी हा या महोत्सवामागचा उद्देश आहे. आंबा पिकवण्यासाठी कुठल्याही रसायनाचा उपयोग न करता नैसर्गिकपणे गवतात पिकवलेला आंबा या महोत्सवात उपलब्ध असणार आहे. 

या वर्षीच्या आंबा महोत्सवात ५० स्टॉल्स असून, त्यातील दहा स्टॉल हे महिला बचत गटासाठी राखीव आहेत. आंबा महोत्सवात कोकणातील इतर पदार्थांचासुद्धा समावेश असणार आहे. या महोत्सवाला जास्तीत जास्त नागरिकांनी भेट देऊन महोत्सव यशस्वी करावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 102 Days ago
How about jackfruit ?
0
0

Select Language
Share Link
 
Search