Next
पुणे जिल्‍हा परिषदेतर्फे ‘फोक्‍सवॅगन’चा सन्‍मान
प्रेस रिलीज
Saturday, December 15, 2018 | 05:10 PM
15 0 0
Share this article:



पुणे : जिल्‍हा परिषदेने पुण्‍यातील सामाजिक विकासामधील सक्रिय सहभागासाठी फोक्‍सवॅगन इंडियाचा सन्‍मान केला. जिल्‍हा परिषद कार्यालयामध्‍ये आयोजित केलेल्या या विशेष समारोहामध्‍ये लोकसभा खासदार आणि समारोहाच्‍या प्रमुख अतिथी सुप्रिया सुळे यांच्‍या हस्‍ते फोक्‍सवॅगन इंडियाचा गौरव करण्‍यात आला.

पुणे जिल्‍ह्याच्‍या विकासासाठी पाठबळ देण्‍यासोबतच गुंतवणूक करणाऱ्या ‘फोक्‍सवॅगन’सोबतच इतर सर्व ४८ कंपन्‍यांचे आभारप्रदर्शन करण्‍यासाठी हा विशेष सोहळा आयोजित करण्‍यात आला होता. फोक्‍सवॅगन इंडिया हेल्‍थकेअर उपलब्‍धता, सक्षम शिक्षण आणि पर्यावरणीय संवर्धानाला चालना देणाऱ्या उपक्रमांच्‍या माध्‍यमातून समुदायांच्‍या सर्वांगीण विकासामध्‍ये सक्रिय योगदानकर्ता आणि सहभागी राहिली आहे.

फाडकेवस्‍ती, निघोजेमध्‍ये शाळेच्या बांधकामापासून ते मोबाइल हेल्‍थ क्लिनिक सुरू करण्‍यापर्यंत ‘फोक्‍सवॅगन’ कार्यरत असलेल्‍या भागांमधील पर्यावरण व समुदायाच्‍या एकूण विकासामध्‍ये योगदान देण्‍यासंदर्भात नेहमीच अग्रस्‍थानी राहिली आहे. वर्षानुवर्षे हा दृष्टिकोन व निर्धाराने त्‍यांना हजारोंच्‍या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्‍यासोबतच सुरक्षित व हरित उत्‍पादन आणि दान करण्‍याच्‍या संस्‍कृतीला चालना देण्‍यासाठी सक्षम केले आहे.



या प्रसंगी बोलताना ‘फोक्‍सवॅगन’च्‍या कॉर्पोरेट सोशल रिस्‍पॉन्सिबिलिटीचे प्रमुख पंकज गुप्‍ता म्‍हणाले, ‘आमची जिल्‍ह्याच्‍या सामाजिक विकासामध्‍ये सक्रिय कॉर्पोरेट सहभागी म्‍हणून निवड केल्‍याबाबत आम्‍हाला आनंद वाटत आहे. आम्‍ही आमच्‍या शेजारील समुदायांच्‍या गरजा व आवश्‍यकता जाणून घेण्‍यासाठी त्‍यांच्‍यासोबत दीर्घ चर्चा केली आहे; तसेच आमचा दीर्घकालीन वाढ व विकासावर फोकस आहे. आम्‍ही स्थिर पद्धतीने समुदायांना साह्य करण्‍याशी कटिबद्ध आहोत. आम्‍ही हे कार्य भविष्‍यात देखील सुरूच ठेऊ.’

‘फोक्‍सवॅगन’ पर्यावरणाच्‍या संरक्षणाप्रती कटिबद्ध असण्‍यासोबतच फोक्‍सवॅगन ग्रुप तत्त्वाशी संलग्‍न असलेल्‍या मानव व समाजाच्‍या विकासासाठी योगदान देते. कंपनी महाराष्‍ट्र आणि देशातील इतर भागांमधील कौशल्‍य विकास, रस्‍ता सुरक्षा शिक्षण, आरोग्‍य व स्‍वच्‍छता आणि शैक्षणिक प्रकल्‍पे अशा प्रकल्‍पांमध्‍ये सक्रिय सहभागी आहे.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search