Next
सामाजिक कार्याबद्दल दिनकर चौधरी यांना जीवनगौरव पुरस्कार
BOI
Friday, June 14, 2019 | 05:54 PM
15 0 0
Share this article:

पुणे : एकता सेवाभावी संस्थेतर्फे सामजिक कार्याबद्दल दिनकर चौधरी यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. नुकत्याच मराठा चेंबरमध्ये झालेल्या कार्यक्रमात अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले आणि अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी यांच्या हस्ते हा पुरस्कार चौधरी यांना देण्यात आला. 


या वेळी पं. शंकर प्रसाद अग्निहोत्री, आमदार रामराव वडकुते, अभिनेता अरबाज खान, प्राध्यापक किशोर वाटकर आदी मान्यवर उपस्थित होते. 


गेली अनेक वर्षे चौधरी हे समाजकार्य करत असून यामध्ये विधवा किंवा घटस्फोट झालेल्या स्त्रियांचे विवाह जुळविणे, हुशार गरीब मुला-मुलींना शैक्षणिक मदत करणे आदी कामांचा समावेश आहे.  


 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search