Next
‘मुळशी पॅटर्न’ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड
प्रेस रिलीज
Thursday, November 29, 2018 | 03:41 PM
15 0 0
Share this story

पुणे : प्रवीण विठ्ठल तरडे लिखित, दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ हा मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच यशस्वी ठरत आहे. २३ नोव्हेंबर २०१८ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने गेल्या चार दिवसांत बॉक्स ऑफिसवर सुमारे सहा कोटींची कमाई करत ही घोडदौड कायम ठेवली आहे.

काल्पनिक कथेवर आधारीत, वास्तवाच्या जवळ जाणाऱ्या या चित्रपटाला मल्टिप्लेक्ससह सिंगल स्क्रीन चित्रपटगृहातसुद्धा प्रेक्षकांची तुफान गर्दी होत आहे. मल्टीप्लेक्समध्ये ‘मुळशी पॅटर्न’चा पहिला शो सकाळी ८.३० वाजता, तर शेवटचा शो रात्री ११.५० वाजता होत असून, चित्रपटाला ग्रामीण भागातही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाने सर्वाधिक कमाई पुणे शहर आणि जिल्ह्यातून केली आहे.

पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्याचे खेड्यापाड्यांतील प्रेक्षक जीप व इतर वाहनांनी जवळच्या चित्रपटगृहात येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मोठ्या शहरांत मल्टीप्लेक्समध्ये तिकिटाचे दर वाढले असून, ते ५० रुपयांपासून ६०० रुपयांपर्यंत गेले आहे, तरीही प्रेक्षकांची गर्दी कायम असल्याचे दिसून येत आहे यामध्ये दोन–तीन वेळा चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्याही मोठी आहे. चित्रपटाची कथा, सादरीकरण, कलाकारांचा अभिनय, चित्रीकरण उत्तम असल्याची प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून दिली जात आहे.

‘मुळशी पॅटर्न’ला संपूर्ण महाराष्ट्रात मिळत असलेल्या तुफान प्रतिसादाबद्दल बोलताना अभिनेता, लेखक, दिग्दर्शक प्रवीण तरडे म्हणाले, ‘चित्रपटाचा विषय मातीतला आहे, त्यामुळे तो प्रेक्षकांना आवडेल, असा मला विश्वास होता. चित्रपटगृहातून प्रेक्षक सुन्न होऊन बाहेर येत आहेत, हेच आमच्या टीमचे यश आहे. महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी गेल्या तीन आठवड्यांत तीन चित्रपटांना भरभरून प्रतिसाद दिला आहे. यातील दोन चित्रपटांच्या मागे मोठ्या स्टुडिओचे पाठबळ होते. आम्ही त्यांच्या तुलनेत कुठेच नव्हतो, तरीही प्रेक्षकांनी आमच्या उत्तम कलाकृतीला दाद दिली याबद्दल मी प्रेक्षकांचे आभार मानतो.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link