Next
‘व्होल्टास’ची ‘समर बोनांझा कंझ्युमर ऑफर’
प्रेस रिलीज
Friday, April 13, 2018 | 04:47 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘व्होल्टास’ या भारतातील पहिल्या क्रमांकाचा एसी ब्रँड असलेल्या टाटा समूहातील कंपनीने २०१८साठी ‘समर बोनांझा कंझ्युमर ऑफर’ सादर केली आहे.

या ऑफरमध्ये ऑल स्टार इन्व्हर्टर एसी, ऑल वेदर स्प्लिट एसी आणि विंडो एसी यांच्या संपूर्ण रेंजवर ‘पीसीबी’सह पाच वर्षांच्या सर्वसमावेशक वॉरंटीचा समावेश आहे. एसी क्षेत्रातील ही अशा प्रकारची एकमेव ऑफर असून, उत्पादनाचे सर्व कार्यात्मक भाग, गॅस चार्जिंग आणि लेबरसह सर्व घटकांना ही ऑफर लागू आहे.

याशिवाय, काही निवडक क्रेडिट व डेबिट कार्डांमार्फत झालेल्या खरेदीवर पाच टक्क्यांची आकर्षक कॅशबॅक ऑफरही जाहीर करण्यात आली आहे. ऑल स्टार इन्व्हर्टर एसी, ऑल वेदर स्प्लिट एसी आणि विंडो एसी या सर्व रेंजमधील एसींच्या खरेदीवर ग्राहकांना या ऑफरचा लाभ मिळू शकतो. ही ऑफर पेपर फायनान्सवरही (छोट्या मुदतीच्या कर्जाद्वारे केलेल्या खरेदीवरही) दिली जाणार असून, एसी क्षेत्रात प्रथमच अशा पद्धतीने पेपर फायनान्सवरही कॅशबॅक ऑफर दिली गेली आहे. शिवाय, ऑल स्टार इन्व्हर्टर एसींच्या रेंजमधील उत्पादनांसाठी मोफत स्टँडर्ड इन्स्टॉलेशनची ऑफरही देण्यात आली आहे.

या वेळी ‘व्होल्टास’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप बक्षी म्हणाले, ‘ग्राहकांना त्यांच्या पैशाचे अतिरिक्त मूल्य मिळवून देण्यात ‘व्होल्टास’ कायमच आघाडीवर राहिली आहे. सर्वसमावेशक उत्पादन वॉरंटी, कॅशबॅक आणि एसींचे मोफत इन्स्टॉलेशन अशी ‘समर बोनांझा कंझ्युमर ऑफर’ जाहीर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे.’

‘व्होल्टास लिमिटेड’विषयी :
आपल्या युनिट्सच्या स्वरूपातील उत्पादनांच्या व्यवसायासह (यामध्ये एअर कंडिशनर्स, एअर कूलर्स आणि व्यावसायिक शीतकरण उत्पादनांचा समावेश होतो.) ‘व्होल्टास’ ही आघाडीची इंजिनीअरिंग सोल्युशन्स पुरवणारी तसेच प्रोजेक्ट स्पेशालिस्ट कंपनी आहे. भारतात १९५४ साली स्थापन झालेली ‘व्होल्टास’ ही कंपनी उष्मीकरण (हीटिंग), व्हेंटिलेशन व वातानुकूलन (एचव्हीएसी), शीतकरण, विद्युत-यांत्रिकी प्रकल्प, वस्त्रोद्योग यंत्रसामुग्री, खाणकाम व बांधकाम उपकरणे, जल व्यवस्थापन व उपचार, शीतगृह सेवा, इमारत व्यवस्थापन प्रणाली, विद्युतीकरण आणि अंतर्गत हवेचा दर्जा आदी क्षेत्रांत इंजिनीअरिंग सेवा पुरवते. ‘व्होल्टास लिमिटेड’ ही टाटा समूहातील आघाडीच्या दहा कंपन्यांपैकी एक आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link